Grampanchayat : जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक राज !

सदर कालावधी मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींवर (Grampanchayat) प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार आहे.
Grampanchayat
GrampanchayatSarkarnama

अकोला : ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मुदती जस-जशा संपतील, तस-तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत. त्यामुळे सदर कालावधी मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींवर (Gram Panchayat) प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार आहे.

कोविड १९ (Covid-19) आजाराबाबत शासनाने लागू केलेले निर्बंध तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) दाखल असलेल्या विविध याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Elections) टप्प्या-टप्प्याने घेण्यात आल्या. आता महाराष्ट्रात (Maharashtra) ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे सात हजार ६४९ तसेच नवनिर्मित ८ तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या १८ अशा एकूण ७ हजार ६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे.

ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदान याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे २-३ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे उक्त सुमारे सात हजार ६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी आवश्यक ते नियोजन आरोग्याच्या स्तरावर करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मुदती जस-जशा संपतील, तस-तसे ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे सदर कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Grampanchayat
ग्रामपंचायत निवडणूक : एकनाथ शिंदे गटाने उघडले खाते; पण भाजपच नंबर वन!

प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायती -

ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येईल.

डिसेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २६५ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com