वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍याच्या कुटुंबांना २० लाख, तेंदुपत्ता कामगारांना मिळणार ७२ कोटी

यावर्षीपासून हा बोनस जवळपास चौपट म्हणजे २० कोटींवरून ७२.५० कोटीपर्यंत जाईल, असा निर्णय घेतल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज सभागृहात केली.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटुंबीयांना देण्‍यात येणा-या १५ लक्ष रुपये अर्थसाहाय्याच्या रकमेत वाढ करत ही रक्‍कम २० लक्ष रुपये इतकी करण्‍याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत जाहीर केला. याबाबतचा शासन निर्णय २३ ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

चंद्रपूर, (Chandrapur) गडचिरोली, (Gadchiroli) गोंदिया (Gondia) हा नक्षलग्रस्त आदीवासाबहुल विभाग आहे. तेंदुपत्ता कामगारांना २०२१ मधील बोनस वाट सुरू झाले आहे. १९ कोटी ८६ लाख रुपये बोनस वाटायचा आहे. आत्तापर्यंत १५.६० कोटी वाटला गेला आहे. यामध्ये प्रशासकीय खर्च वजा करण्याची पद्धत पुढच्या वर्षीपासून बंद करण्यात येईल. त्याचा फायदा १ लाख ६० हजार पेक्षा जास्त आदिवासी, वनवासी व ग्रामीण कुटुंबांना होणार आहे. सध्या आपण जो बोनस देतो, तो २० ते २१ कोटी रुपये असतो. पण यावर्षीपासून हा बोनस जवळपास चौपट म्हणजे २० कोटींवरून ७२.५० कोटीपर्यंत जाईल, असा निर्णय घेतल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज सभागृहात केली.

राज्‍याच्‍या वनविभागाच्‍या माध्यमातून उत्‍तम पद्धतीने वनसंवर्धनाचे कार्य सुरू असल्‍याने वन्‍यप्राण्‍यांच्‍या संख्‍येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मानव–वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने वनालगतच्‍या गावांमध्‍ये राहणा-या नागरिकांना वनविभागामार्फत प्रबोधन करण्‍यात येत असून डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमार्फत स्‍थानिक जनतेचे वनावरील अवलंबित्व कमी करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामध्‍ये सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन वर्षात अनुक्रमे ४७, ८०, ८६ इतकी मनुष्‍यहानी झाली आहे. मनुष्‍यहानी झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या अवलंबित कुटुंबीयांना वाघ, बिबट्या, रानडुक्‍कर, गवा, अस्‍वल, लांडगा, कोल्‍हा, हत्‍ती व रानडुकरे यांच्‍या हल्‍ल्‍यात होणा-या मनुष्‍यहानीमुळे देण्‍यात येणा-या अर्थसाहाय्याच्या रकमेत वाढ करण्‍यात आली आहे.

Sudhir Mungantiwar
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘किसानों के लिये, अब सरकार उतरी मैदान मे !’

यापुढे १५ लक्ष ऐवजी २० लक्ष रुपये इतके अर्थसाहाय्य देण्‍यात येणार आहे. २० लक्षपैकी १० लक्ष देय असलेल्‍या व्‍यक्‍तीला तात्‍काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्‍कम रुपये १० लक्ष त्‍यांच्‍या राष्‍ट्रीयकृत बॅंकेत असलेल्‍या दरमहा व्‍याज देणा-या संयुक्‍त खात्‍यामध्‍ये ठेव रक्‍कम अर्थात फिक्‍स डिपॉझीट जमा करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. व्‍यक्‍ती कायम अपंग झाल्‍यास ५ लक्ष तर व्‍यक्‍ती गंभीररीत्या जखमी झाल्‍यास १ लक्ष २५ हजार रुपये इतके अर्थसाहाय्य देण्‍यात येणार आहे. व्‍यक्‍ती किरकोळ जखमी झाल्‍यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्‍यात येणार असून खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्‍याचे असल्‍यास त्‍याची मर्यादा २० हजार रुपये प्रती व्‍यक्‍ती इतकी राहणार आहे.

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात गाय, म्‍हैस, बैल यांचा मृत्यू झाल्‍यास देण्‍यात येणा-या ६० हजार रूपये. इतक्‍या रकमेत वाढ करून ती ७० हजार रुपये. इतकी करण्‍यात आली आहे. मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्‍यास देण्‍यात येणा-या १० हजार रुपये इतक्‍या रकमेत वाढ करून १५ हजार रुपये इतकी वाढ करण्‍यात आली आहे. गाय, म्‍हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्‍व आल्‍यास देण्‍यात येणारी १२ हजार इतकी रक्‍कम वाढवून १५ हजार रुपये करण्‍यात आली आहे. तसेच गाय, म्‍हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्‍यास देण्‍यात येणारी ४ हजार रुपयांची रक्‍कम ५००० रुपये इतकी करण्‍यात आली आहे. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात होणारी मनुष्‍यहानी व त्‍यामुळे संबंधित कुटूंबियांची होणारी आर्थिक परवड लक्षात घेता त्‍या पार्श्‍वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा निर्णय महत्‍वपूर्ण मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com