Grampanchayat Election News: ४५ पैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध; गावातील पारांवर राजकीय चर्चांना उधाण...

Grampanchayat Election 2022: नेत्यांमधील असणारा संघर्ष कायम ठेवण्याचे काम कार्यकर्ते प्रामाणिकपणे करत असतात.
Washim
WashimSarkarnama

रुपेश बाजड

Grampanchayat Election News : वाशीम (Washim) जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यात १८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा प्रचाराचा वेग वाढत आहे आणि गावागावांतील प्रचार शिगेला पोहोचला आहे . यामुळे गावांतील वातावरण ढवळून निघाले असून, गावांतील पारांवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू आहे. ४५ पैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत . उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर गावागावांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर प्रचाराचा धुरळा अंतिम टप्प्यात आहे. नेत्यांमधील संघर्ष पाझरत गेलेला असतो. त्यामुळे गावागावांत नेत्यांचे गट तट झाले आहेत. नेत्यांमधील (Political Leaders) असणारा संघर्ष कायम ठेवण्याचे काम कार्यकर्ते प्रामाणिकपणे करत असतात. परंतु, अलीकडील काळात एकमेकांचे कट्टर विरोधक कधी एकत्र येतील, याचा नेम नसतो. कार्यकर्ते मात्र कधी एकत्र येताना दिसत नाही. यावेळची ग्रामपंचायत निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरत आहे.

पारंपरिक विरोधकांचे कार्यकर्ते काही ठिकाणी नेत्यांच्या भूमिका बाजूला ठेवून एकत्र आल्याचे दिसतात. त्यामुळे प्रत्येक गावातील राजकीय चित्र वेगळे आहे. मतदानासाठी केवळ दोनच दिवस राहिले असल्यामुळे प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. बहुतेक सर्व उमेदवारांचा वैयक्तिक गाठीभेटींवरच अधिक भर आहे. गावांतील मुख्य रस्त्यांच्या बाजूला उमेदवारांनी प्रचाराची कार्यालये उघडली आहेत. गावांतील चौक डिजिटल फलकांमुळे रंगीबेरंगी झाले आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचाराचा नुसता धुरळा सुरू आहे. एका गटाचा उमेदवार सकाळी एखाद्याच्या घरी जाऊन आला की, सायंकाळी विरोधक लगेच त्या मतदारांशी संपर्क साधत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रचारासाठी ऑनलाइनचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

२१व्या शतकातील सर्व माध्यमांचा वापर हा आपल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कसा करता येईल, याकडे उमेदवार लक्ष देऊन आहेत. गाडीला बांधलेले भोंगे हद्दपार झाले असून आता मोठमोठे बॅनर व फ्लेक्सने जागा घेतली आहे. डिजेवर वाजणारे व्हिडिओच्या माध्यमातून सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत मोबाइलवरील सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा प्रचार पराकोटीचा आहे. आता मतदारांनी आभासी पद्धतीने मतदान यंत्राचे बटण दाबावे, एवढेच काय ते शिल्लक आहे. लोकसभा, विधानसभेत जाहीरनामे झळकत होते, परंतु आता स्थानिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही उमेदवार जाहीरनामे देऊन मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

Washim
Bhandara Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणूक : भंडाऱ्यात ‘जाऊ’ बाई जोरात; होणार काट्याची टक्कर...

बॅनरचा हिशोब द्यावा लागणार..

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदा डिजिटल फलक वापरले जात आहे. ग्रामपंचायत सरपंच व सदस्य निवडणुकीत खर्च मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिली आहे. त्यामुळे या बॅनरचा खर्चही उमेदवाराला निवडणूक खर्चात द्यावा लागणार आहे. एखाद्या उमेदवाराने बॅनरचा खर्च सादर केला नाही तर त्याचे सदस्यपदही खारिज होवू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com