महाराष्ट्र काँग्रेसवर विदर्भाच वर्चस्व; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला ठेंगा

Congress | Maharashtra Congress | Vidrabha : प्रादेशिक समोतल राखण्यास काँग्रेसला अपयश आल्याच्या चर्चा
Sandhya Sawalakhe - Nana Patole - Kunal Raut
Sandhya Sawalakhe - Nana Patole - Kunal Raut Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या (Congress) प्रदेश अध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत जवळपास १ लाख ६० हजारांच्या मताधिक्याने विजयश्री खेचून आणणाऱ्या कुणाल राऊत (Kunal Raut) यांची काल प्रदेशाध्यक्षपदी निवड घोषित करण्यात आली. अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी जारी केलेल्या पत्राद्वारे राऊत यांची नियुक्ती जाहीर केली. मात्र राऊत यांच्या निवडीमुळे आता महाराष्ट्र काँग्रेसमधील आणखी एक महत्वाचे पद विदर्भात गेले आहे.

यापूर्वी काँग्रेसकडून महिला प्रदेशाध्यक्ष पदी यवतमाळच्या संध्या सवालाखे (Sandhya Sawalakhe) यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदी देखील विदर्भातील चेहरा आणला. विधानसभा अध्यक्ष असलेल्या नाना पटोले (Nana Patole) यांचा राजीनामा घेवून त्यांना प्रदेशाध्यक्ष पदी आणण्यात आले. पटोले हे मुळचे भंडाऱ्याचे असून ते साकोली मतदार संघातून निवडून आले आहेत. याशिवाय नाना पटोले यांनी पदावर आल्यानंतर संघटनेत फेरबदल केले. त्यात देखील पटोले यांनी मुख्य प्रवक्ते पदी नागपूरच्या अतुल लोंढे यांना संधी दिली.

Sandhya Sawalakhe - Nana Patole - Kunal Raut
हाउ इज द जोश! गोव्यातील विजयानं भाजप अन् फडणवीसांमध्ये दहा हत्तींचं बळ

याशिवाय अमरावतीच्याच डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या संघटनेतील जवळपास सर्वच मुख्य पदांवर विदर्भाला संधी देण्यात आल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कोट्यातही विदर्भाचाच वरचष्मा दिसून येत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला १० कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री पद आली आहेत. त्यातही १० कॅबिनेट मंत्र्यांपैकी ४ मंत्री हे विदर्भातून निवडून आले आहेत. अमरावतीच्या यशोमती ठाकूर, वर्ध्याचे सुनिल केदार, नागपूरचे नितीन राऊत आणि चंद्रपुरच्या विजय वडेट्टीवार यांचा यात समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com