जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या!

अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माहिती दिली.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या!
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भातील (Local authority) निकाल ४ मेस काय लागेल तो लागेल; परंतु राज्य निवडणूक आयोगाने (State election commission) पावसाळ्यात निवडणुका घेता येणार नसल्याचे राज्य सरकारला (Maharashtra Government) कळविले असल्याने कार्यकर्त्यांनी निवडणुका लांबण्याची मानसिकता ठेवावी, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

Chhagan Bhujbal
संसार उभारायला अक्कल लागते, धुडगूस घालायला नाही!

राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार सर्वश्री दिलीप बनकर, ॲड. माणिकराव कोकाटे, सरोज आहिरे, नितीन पवार, श्रीराम शेटे, माजी आमदार दीपिका चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, रवींद्र पवार, कोंडाजी मामा आव्हाड आदी उपस्थित होते.

Chhagan Bhujbal
राज ठाकरेंना इशारा?... राणा दाम्पत्याचे काय झाले लक्षात आहे ना?

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वांना बरोबर घेऊन निर्णय घेऊ. आमदारांनी आमदारकी टिकविण्याचे काम करावे, मतभेद मिटवावेत, जुने-नवे एकत्र घेऊन काम करावे, पदांमध्ये बदल करण्याची सध्या आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचा आमदार असलेल्या चांदवड विधानसभा मतदारसंघात ८० कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्याच्या तक्रारीबाबत ते म्हणाले, या मतदारसंघात फक्त भाजपच्या आणदारांने कामे केलेली नाहीत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण तसेच आमदार सुधीर तांबे यांच्या निधीतून कामे झाली आहेत.

पीककर्जाबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत ‘नाबार्ड’कडून जिल्हा बॅंकांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. आमदारांनी सुचविलेली कामे करावीच लागतात असे उत्तर पदाधिकाऱ्यांना न विचारता मंत्रालयातून परस्पर कामे होत असल्याच्या तक्रारीबाबत त्यांनी सांगितले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.