मिनी मंत्रालयाचे निकाल अन् नाशिकचे भवितव्य ठरवणार!

उत्तर महाराष्ट्रातील धुळे- नंदुरबार-जळगावचा डीएनए तसा नाशिकशी फार जुळत नाही.
मिनी मंत्रालयाचे निकाल अन् नाशिकचे भवितव्य ठरवणार!
Balasaheb Thorat, Chhagan Bhujbal & Sanjay RautSarkarnama

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील धुळे- नंदुरबार-जळगावचा डीएनए तसा नाशिकशी फार जुळत नाही. (Dhule, Nandurbar & Jalgaon`s Political DNA doesn`t match in North Maharashtra पण राजकीय- सामाजिक समीकरणांचा संपूर्ण विभागात प्रभाव पडत आला आहे. एकजिन्नसीपणा नाशिक विभागात नसला तरी एकमेकांवर प्रभाव पाडणारी समीकरण इथे जुळत आली आहेत. जिथून ओबीसी राजकीय आरक्षणाचा (OBC political reservations issue may take prominant place) धुराळा उडण्यास सुरवात झाली आहेत.

Balasaheb Thorat, Chhagan Bhujbal & Sanjay Raut
`ईडी`ची कारवाई विसरून राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी!

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात नुकतीच पोटनिवडणूक झाली. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुख्य फटका भारतीय जनता पक्षाला बसला. या पोटनिवडणुकांचा प्रभाव येऊ घातलेल्या नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये नक्कीच पडू शकतो. किंबहुना महाविकास आघाडीचे मनोबल वाढल्याने एकत्र निवडणुकांना सामोरे जाण्याच्या पर्यायावरदेखील नाशिक शहर आणि जिल्ह्यांत विचार होऊ शकतो, हे पोटनिवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे

Balasaheb Thorat, Chhagan Bhujbal & Sanjay Raut
आमदार सरोज अहिरे शिवसेनेला खरोखर शिंगावर घेतील?

काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचा चेहरा असलेले छगन भुजबळ यांच्यात सुसंवाद आहे, ही काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत, नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये राजकीय सुसंवाद घडून येणे शक्य आहे. नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रभाव अधिक राहणार हे सांगण्यासाठी राजकीय तज्ज्ञांची गरज नाही. त्यात काँग्रेसलाही स्पेस मिळण्याची शक्यता आघाडीच्या राजकारणातून निर्माण होऊ शकते. दिग्गज नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीला नाशिकमध्ये लाभ घेता येणे शक्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या डावपेचांना सामोरे जाण्यासाठी भाजपचा अधिक कस लागणार आहे. नाशिक भाजपवर खानदेशचा मोठा प्रभाव आहे. पू्र्वी एकनाथ खडसे, तर आता गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्याकडे भाजपची सूत्रे आहेत. मात्र तिथल्या मानसिकतेतून नाशिकच्या राजकारणाचे डावपेच आखले जाऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. स्थानिक भाजप नेत्यांना अधिकाधिक विश्वासात घेऊन भाजपला रणनीती आखावी लागेल.

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपचे धुळे, नंदुरबारमध्ये प्रत्येकी तीन जागांचे नुकसान झाले आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना पोटनिवडणुकीत उत्तम यश मिळाले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागांमध्ये झालेली लक्षणीय वाढ या दोन्ही पक्षांचे मनोबल वाढविणारी आहे. धुळ्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वाढते वर्चस्व काँग्रेससाठी पुढच्या काळात डोकेदुखी ठरू शकते. सध्याचे आमदार कुणाल पाटील यांच्या वर्चस्वाला हा धक्का मानला जातो, तर धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या वर्चस्वाला या निवडणुकीने हादरा दिला आहे. माजी मंत्री आणि भाजपचे युवानेते जयकुमार रावल यांचे वर्चस्व असलेल्या शिंदखेड्यातील चारपैकी तीन जागा भाजपने राखल्या आहेत, हे रावल यांच्यासाठी सुचिन्ह म्हणावं लागेल.

नंदुरबारच्या राजकीय विश्वात पक्षाला फारसं महत्त्व नाही. पक्षाहून अधिक घराणेशाहीची लढत तिथे रंगते. रघुवंशी आणि गावित या परिवारांचे वलय मोठे आहे. त्यामुळे पक्षाचे चिन्ह केवळ नावापुरते उरते. नंदुरबारमध्ये चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी आणि डॉ. विजय गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांचे विजय घराणेशाहीवर शिक्कामोर्तब करणारे आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेत भाजपने तीन जागा गमावल्या आहेत. या जागा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत. माजी मंत्री दिलवरसिंग पाडवी यांचे पुत्र नागेश पराभूत झाले, तर सध्याचे मंत्री के. सी. पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी आणि दीपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. जयपाल रावल यांच्या पत्नी ऐश्वर्या यांनी विजयश्री खेचून आणली, ही तेवढी भाजपसाठी जमेची बाजू आहे. नाशिकमधील आगामी निवडणुकांसाठी मात्र भाजपला रणनीतीची पुनर्बांधणी करावी लागणार आहे.

...

Related Stories

No stories found.