अर्थसंकल्पातून युवकांच्या पदरी घोर निराशा!

बेरोजगारी रोखण्यास केंद्र सरकार अपयशी ठरल्याची माजी खासदार समीर भुजबळ यांची टिका.
Sameer Bhujbal, EX M.P.
Sameer Bhujbal, EX M.P.Sarkarnama

नाशिक : देशात बेरोजगारीत (Unemployment) मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना यंदाच्या केंद्र सरकारकडून (Centre Government) सादर होणाऱ्या बजेटमध्ये रोजगाराच्या अनेक संधी युवकांना उपलब्ध होतील अशी आशा होती. मात्र अर्थसंकल्पाच्या माध्यमातून रोजगारवाढीसाठी मोठी तरतूद नसल्याने देशातील युवकांच्या पदरी घोर निरशा पडली असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी व्यक्त केली आहे.

Sameer Bhujbal, EX M.P.
केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चूहा!

माजी खासदार भुजबळ यांनी अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेत म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट देशावर घोंगावत असून चार कोटीहून अधिक नागरिकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहे. अशा परिस्थितीत केवळ ६० लक्ष नोकरीचे उद्दिष्ट केंद्रीय अर्थसंकल्पातून मांडण्यात आले आहे. हे उद्दिष्ट बेरोजगारीच्या तुलनेत अतिशय तुटपुंजे असून युवकांना रोजगार देण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे.

Sameer Bhujbal, EX M.P.
द्राक्ष उत्पादकांचा इशारा, ‘वाइन’चा अपप्रचार थांबवा!

कोरोनाचा सर्वाधिक फटका हा असंघटीत कामगारांना सर्वाधिक फटका बसला असून त्यांच्यासाठी कुठलाही ठोस उपाययोजना करण्यात आल्याचे अर्थसंकल्पात दिसत नसल्याचे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय सर्वसामान्य नागरिकांना करसवलतीच्या माध्यमातून दिलासा देण्याची आवश्यकता होती. मात्र सर्वसामान्य करदात्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य करदात्यांच्या पदरी यंदाही निराशा पडली आहे. शेतकऱ्यांसाठी देखील कुठलीही ठोस तरतूद केली गेलेली दिसत नाही. त्याचबरोबर सरकारने हाती घेतलेले स्मार्ट सिटी अभियान, नाशिक मधील नमामि गोदा प्रकल्प, रेल्वे बाबत अर्थसंकल्पात कुठलीही विशेष तरतुत किंवा स्पष्टता दिसून येत नसल्याचे नाशिककरांच्या पदरी यंदा देखील निराशास समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com