बाळासाहेब थोरातांचे विकास मॉडेल युवक काँग्रेसचे पदाधिकारी थक्क!

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसी संवाद साधला.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

नाशिक : केवळ निवडणुका (Elections) आल्या की राजकारण करणे योग्य नाही. जनतेचे जीवन सुसह्य, आनंदी व समस्यामुक्त करण्यासाठी सतत झटले पाहिजे. त्यासाठी माझे संपर्क कार्यालय २४ तास खुले असते. राजकारणासाठी नव्हे जनतेसाठी काम करावे. यश निश्चित मिळते, असा विश्वास काँग्रेसचे नेते, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat) यांनी सांगितले.

Balasaheb Thorat
नगरसेवकाला सुनावले, कँलेंडर नको, २.७४ कोटींचा हिशेब द्या!

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी संघटनेचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांसाठी दोन दिवसीय अभ्यास शिबिर आणि स्नेहमेळावा घेतला. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांनी संगमनेर विकासाचे मॉडेल अभ्यासले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Balasaheb Thorat
देविदास पिंगळेंनी शेतकऱ्यांचे थकलेले २५ लाख रुपये मिळवून दिले!

शिबिरामध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था, शेतकी संघ, राजहंस ट्रान्स्पोर्ट कंपनी, शाम प्रो, अमृतवाहिनी बँक, संगमनेरमधील अद्ययावत बसस्थानक, पंचायत समिती-प्रांताधिकारी कार्यालय यासह श्री. थोरात यांचे २४ तास कार्यरत असलेले यशोधन संपर्क कार्यालयाला पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वानुसार कार्यपद्धती पुढे नेल्याने सहकारातून ग्रामविकास साधला गेला आणि शहराची बाजारपेठ खुली झाली, अशी प्रतिक्रिया शिबिरार्थींनी नोंदवली.

श्री. तांबे म्हणाले, की श्री. थोरात यांनी राजकारण व समाजकारण हे गरीब माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी केले. निवडणुकीपुरते राजकारण करणे योग्य नाही. जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करणे हे ध्येय ठेवून प्रत्येकाने काम करावे. आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, श्री. थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या घटकापर्यंत काँग्रेसचा विचार पोचवण्याचे काम आपण केले. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. ग्रामीण विकासाचे संगमनेरचे सहकाराचे मॉडेल राबवण्यासाठी मदत केली जाईल. मालपाणी हेल्थ क्लबमध्ये आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत शिबिरार्थींचा सन्मान करण्यात आला.

...

काँग्रेस पक्षाला मोठी समृद्ध परंपरा असून तरुणांना पक्षामध्ये मोठी संधी आहे. प्रत्येक पक्षाला संकटातून जावे लागते. पण संकटामध्ये जो लढतो, तो खरा सैनिक असतो. सत्यजित तांबे यांनी युवक काँग्रेसचे राज्यभर संघटन उभे केले. त्यामुळे युवकांमध्ये चैतन्य तयार झाले आहे. संघटनेला बळकटी मिळाली.

- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com