Congress: युवक काँग्रेस हीच काँग्रेसची खरी ताकद

आमदार कुणाल पाटील यांनी धनूर (ता. धुळे) येथे युवक कॉंग्रेस शाखेच्या फलकाचे अनावरण केले.
Kunal Patil with Congress leaders
Kunal Patil with Congress leadersSarkarnama

धुळे : युवक काँग्रेस (Youth Congress) हीच काँग्रेस (Congress) पक्षाची खरी ताकद आहे. देशातील सत्तेचा दुरुपयोग आणि विरोधकांचा आवाज दडपून महागाईचा विक्रम केलेल्या भाजप (BJP) सरकारला युवक काँग्रेस आव्हान देईल. जनतेच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम युवकांनी करावे, असे आवाहन काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी केले. (Youth congress shall go to society n resolve there issues)

Kunal Patil with Congress leaders
Shivsena: बंडखोर आमदाराच्या भगीनाने मातोश्रीवर दिली हजारो शपथपत्र

प्रदेश युवक काँग्रेस अंतर्गत धुळे जिल्हा युवक काँग्रेसने सुरू केलेल्या ‘माझं गाव- माझी शाखा’ अभियानांतर्गत आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते धनूर लोणकुटे (ता. धुळे) येथे युवक काँग्रेस शाखेचे फलक अनावरण झाले. विश्‍वास पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत ओगले, राष्ट्रीय सचिव वंदना बेन, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे आदी उपस्थित होते.

Kunal Patil with Congress leaders
NMC Election: प्रभागरचना बदलल्याने भाजप शिवसेनेला शह देणार?

आमदार श्री. पाटील म्हणाले, की भाजप सरकारने सर्वसामान्यांच्या दैनंदिन गरजांवर जीएसटी वाढविल्याने महागाई वाढली आहे. गॅस, पेट्रोलचे भाव वाढविले. उद्योग, कारखाने बंद पडले, बेरोजगारी वाढली. त्याविरोधात काँग्रेस आवाज उठवीत असल्याने केंद्रातील भाजप सरकार दडपशाहीचे राजकारण करीत आहे. देशात हुकूमशाही पद्धतीने काम सुरू असून, संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे युवक काँग्रेसने आता रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, दूध संघाचे चेअरमन वसंत पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव किरण पाटील, राहुल माणिक, पंकज चव्हाण, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हर्शल साळुंके, राजीव पाटील, युवक काँग्रेसचे महासचिव चेतन शिंदे, अंजन पाटील, तालुकाध्यक्ष हरीश पाटील, सागर पाटील, संचालक विजय पाटील, शरद पाटील, हिंमत बाचकर, देविदास पाटील, हिरामण चौधरी, साहेबराव कोळी, विजय चौधरी, गणेश गर्दे, चेतन शिंदे आदी उपस्थित होते.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in