कार्यकर्ते पक्षासाठी, नेते कुटुंबातील उमेदवारांसाठी लढले!

नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या विविध जागांसाठी ही पोट निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
कार्यकर्ते पक्षासाठी, नेते कुटुंबातील उमेदवारांसाठी लढले!
K C Padvi, Vijaykumar Gavit & Chandrkant RaghuwanshiSarkarnama

नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत (By election of Zp & Pancahayt samiti in Nandurbar being a reputation for all party leaders) जिल्ह्यातील तिन्हीही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या कुटुंबातील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. त्यामुळे ही पोट निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. या तिन्ही नेत्यांनी आपले उमेदवार निवडून आणण्यात यश आले आहे.

K C Padvi, Vijaykumar Gavit & Chandrkant Raghuwanshi
शरद पवारांनी सांगितली आठवण...म्हणाले संरक्षणमंत्री झाल्यावर थेट कोल्हापूर गाठले!

काँग्रेसचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी, भाजपचे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी या नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या विजयासाठी परिश्रम घेतेल. यावेळी पक्षाचे उमेदवार मात्र स्वतःव कार्यकर्ते पक्षासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसले. आजच्या राजकारणातील ही अपरिहार्यता व वास्तव कालच्या पोटनिवडणुकीत दिसले.

K C Padvi, Vijaykumar Gavit & Chandrkant Raghuwanshi
धुळे-नंदूरबारचा संदेश भाजपला संपूर्ण राज्यासाठी इशारा?

जिल्ह्यात कोपरली गटातून शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पुत्र ॲड. राम रघुवंशी यांना पुन्हा निवडणुकीत उतरविले होते. तर खापर गटातून आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी त्यांची बहिण गीता पाडवी यांना कॉंग्रेसची उमेदवारी दिली होती. कोळदा गटातून आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी द्वितीय कन्या डॉ. सुप्रिया गावित यांना उमेदवारी दिल्यामुळे या तिन्ही नेत्यांना आपल्या कुटुंबातील मतदारक्षेत्रात विशेष लक्ष घालावे लागले. या उमेदवारांमुळे पोट निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. एकमेकांनी एकमेकांचे उमेदवार पराभूत करण्यासाठीही जोर लावल्यामुळे आपल्या कुटुंबातील उमेदवार निवडून आणणे ही प्रतिष्ठा बनली होती.

आमदार कार्यालयावर विजयोत्सव

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आमदार कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरला. यावेळी सेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

एक वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली. त्या कामाची पावती कोपरली गटाच्या मतदारांनी आज दिली आहे. पुढील साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात प्रामाणिकपणे ग्रामस्थांची योजनेच्या माध्यमातून सेवा करेल. गटात जे काही अपूर्ण कामे आहेत ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल.

- राम रघुवंशी, विजयी उमेदवार, कोपरली गट

आमदार डॉ. विजयकुमार गावित व खासदार डॉ. हीना गावित यांनी मतदारसंघात विकासकामे केली आहेत. कोळदा गटात विकासाचे ध्येय घेऊन उमेदवारी केली. ग्रामस्थांनी विश्वास ठेवून निवडून आणले त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.

- डॉ. सुप्रिया गावित, विजयी उमेदवार, कोळदा गट

Related Stories

No stories found.