पाण्यासाठी महिलांची पायपीट थांबलीच पाहिजे

अभोणा येथे जलजीवन मिशन योजनेचे डॉ. भारती पवार यांनी उदघाटन केले.
Dr Bharti Pawar
Dr Bharti PawarSarkarnama

अभोणा : प्रत्येक महिला (Womens) ही कुटुंबाचा कणा असते. पाण्यासाठी तिची होणारी वणवण थांबावी, हाच या जलजीवन मिशनचा (Jal jeevan mission) उद्देश आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी केले.

Dr Bharti Pawar
इच्छुक म्हणतात, भाजप-मनसे युती हाच पर्याय!

येथील जलजीवन मिशन योजनेच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून फलकाचे अनावरण करण्यात आले.

Dr Bharti Pawar
आर्थिक विषमता हटविण्याची क्षमता केवळ सहकारात!

डॉ. पवार म्हणाल्या, जलजीवन योजनेचा आराखडा तयार करताना स्वतंत्र जल मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली. शुद्ध व निरामय पाण्यासाठी ‘हर घर जल, हर घर नल’ हा उपक्रम निव्वळ जिल्हा किंवा राज्यासाठी नसून संपूर्ण देशपातळीवर राबविला जात आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातून कामे पूर्ण करण्यात आली. केंद्रीय स्तरावरील सर्व योजना तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणे हेच महत्वाचे कार्य केंद्र सरकारने हाती घेतले आहे. कोरोना गेला असे कुणीही समजू नका. सर्वांनी मास्क वापरा व ज्यांचे लसीकरण बाकी आहे, त्यांनी त्वरित लस घेऊन सुरक्षित राहा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, एन. डी. गावित, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, कार्यकारी अभियंता पी. सी. भांडेकर, सुरेश येवला यांनी यांनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी प्रांताधिकारी विकास मीना, तहसीलदार बी. एम. कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, उपअभियंता वाय. डी. वळवी, प्रतीक्षा नेरकर, भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, डॉ. अनिल महाजन, गोविंद कोठावदे, सुधाकर पगार, एस. के. पगार, चंद्रशेखर जोशी, सोनाली जाधव उपस्थित होते

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com