
मालेगाव : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात एका वृत्तवाहिनीत भाजपच्या (BJP) तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे मुस्लीम समाज बांधवांनी संताप व्यक्त केला. नुपूर शर्मा यांच्या निषेधार्थ येथील रमजानपुरा भागातील सामाजिक कार्यकर्त्या शमीम शेख शकील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी महिलांनी निषेध मोर्चा काढला. (Womens agitation in malegaon city on Nupur Sharma`s statement)
मोर्चाला रमजानपुरा भागातील संजरी चौकातून सुरवात झाली. मोर्चात परिसरातील बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चा हाजी अहमदपुरा, हजार खोली, शबान नगर, सखावत हॉटेल, मच्छी बाजार, भंगार बाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाहुन शहर पोलिस ठाण्यात आला. मोचेकऱ्यांनी पोलिसांना निवेदन सादर केले. महिलांनी हातात फलक घेऊन नुपूर शर्मा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
इमाम कौन्सिलची निदर्शने
नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा इमाम कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी व निदर्शने करत नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. पोलिसांनी शर्मा व जिंदाल यांना अटक करुन कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात मुन्नी शेख, अल्कमा अन्सारी, अन्सारी राफीकुन्नीसा, जैतूनबी शेख आदींसह बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.मौलाना इरफान दौलत नदवी, जुबेर काजी, अतिक कमरान, आबिद गफूर, उबेदूर रहेमान, मुस्तफा हबीब आदी सहभागी झाले होते.
----
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.