Nashik ACB: नाशिकच्या 'एसीबी'त महिलाराज; दोन महिन्यांत तब्बल ७० लाचखोरांना अटक

Sharmishtha Walavalkar: यापूर्वी वर्षभरात होत होत्या १०० ते १२० कारवाया
Sharmishtha Walavalkar
Sharmishtha WalavalkarSarkarnama

Maharashtra ACB: राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी)च्या विभागांमध्ये नाशिकचा विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. या विभागाने दोन महिन्यात सुमारे ५० सापळे लावून ७० लाचखोरांना अटक केली आहे. या यशाचे श्रेय विभागाच्या अधीक्षकांना जाते.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी शर्मिष्ठा वालावलकर (Sharmishtha Walavalkar) यांच्याकडे आहे. तसेच त्यांच्यासोबत तब्बल १५ अधिकारी, कर्मचारीही महिलाच आहेत. नाशिकच्या 'एसीबी' विभागात महिलाराज आल्यानंतर दिवसाआड यशस्वी कारवाई होत आहे. त्यामुळे लाचखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

प्रशासनातील भ्रष्टाचारावर रोखण्यासाठी गृहविभागाअंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्य करतो. या विभागाकडून वर्षभरात शासनाच्या विविध कार्यालयात वर्ग एकपासून ते वर्ग चारपर्यंतच्या कर्मचाऱ्यांवर लाचखोरीप्रकरणी कारवाई केली जाते. नाशिकमध्ये या विभागाच्या माध्यमातून वर्षभरात साधरणपणे १०० ते १२० सापळे यशस्वी केले जात होते. यंदा मात्र याच विभागाकडून वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत तब्बल ४९ सापळे यशस्वी केले आहेत. त्यात एकूण ७० लाचखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

अधीक्षक वालावलकर Sharmishtha Walavalkar यांनी पदभार स्वीकारल्यपासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर जिल्ह्यात पथकाकडून कारवाईचा धडाकाच लावला आहे. दोन महिन्याच्या कालावधीत दर दिवसाला एका लाचखोराला अटक केली आहे. वालावलकर आणि त्यांच्या टीमने केलेल्या कारवायांमुळे नाशिक विभागातील लाचखोरांवर चांगलाच वचक बसला आहे. त्यांच्या या कामगिरीचे सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ACB 'एसीबी'च्या या कामगिरीत अधीक्षक वालावलकर यांच्यासह उपअधीक्षक वैशाली माधव पाटील, वरिष्ठ निरीक्षक साधना भोये-बेलगावकर, निरीक्षक साधना भगवंत इंगळे, निरीक्षक मीरा वसंतराव आदमाने, निरीक्षक गायत्री मधुकर जाधव, धुळ्याच्या निरीक्षक माधवी वाघ, नंदुरबारच्या निरीक्षक नेत्रा जाधव या सात अधिकारी व वरिष्ठ श्रेणी लिपिक वनिता महाजन, गायत्री कुलथे, जयश्री शिंदे, निम्न लघुलेखक वर्षा बागले, शीतल सूर्यवंशी, ज्योती शार्दूल, क्षितिजा रेड्डी आदी १५ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

शर्मिष्ठा वालावलकर (Sharmishtha Walavalkar) म्हणाल्या, "एसीबी'च्या कार्यालयात माझ्यासह एकूण १५ महिला कार्यरत आहेत. त्यांचे योगदानही महत्त्वाचे आहे. कार्यरत सर्वच अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे एकत्रित काम करतात. त्यांच्या सांघिक कार्यामुळेच नाशिक विभागात सर्वाधीक कारवाई यशस्वी करता आल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे यापुढेही अशाच प्रकारे कारवाया करुन भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न करणार आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in