
Sanjay Raut wel come Prem Patil in shivsena
Sarkarnama
नाशिक : माजी महापौर दशरथ पाटील यांचा शिवसेना (Shivsena) सोडून १४ वर्षाच्या वनवासानंतर त्यांचे पुत्र प्रेम पाटील यांचा शिवसेना महानगरप्रमुखांच्या (Nashik) मध्यस्थीने शिवसेना प्रवेश घडला. यामुळे सातपूर परिसरात शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. यानिमित्ताने दशरथ पुत्र प्रेमची ‘रामायणा’ च्या दिशेने दुसऱ्या अध्यायाला सुरवात झाल्याचेही बोलले जात आहे.
प्रेम पाटील हे वाणिज्य शाखेत पदवीधर आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत अपक्ष असतानाही त्याने चांगली मते मिळवली. प्रेमळ व मितभाषी स्वभाव असल्याने प्रेमने जनतेच्या मनात चांगलेच घर केल्याचे लोक सांगतात. घरी येणाऱ्यांची आस्थेने विचारपूस करत चहा पाण्याशिवाय ते जाऊ देत नाही, ही त्यांची खासियत. राजकारणावर अवलंबून न राहता स्वतः पेरूची बाग, पोकलॅण्ड व बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्सचे काम करून ते स्वतःच्या पायावर आज भक्कम उभे आहेत. टक्केवारीसाठी नव्हे तर जनतेच्या प्रेमाच्या टक्केवारीसाठी त्यांना निवडून यायचे, असे ते म्हणतात. दशरथ पाटील यांनी एकेकाळी ज्यांना मदतीचा हात दिला, असे सुधाकर बडगुजर यांनीच प्रेम पाटील यांचा प्रवेश घडवून आणत खऱ्या अर्थाने दोस्ती निभावली. त्यामुळे येथून पुढे दशरथ पुत्र प्रेमची रामायणाच्या दिशेने दुसऱ्या अध्यायाला सुरवात झालीय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आणखी कोणाकोणाचा नंबर ?
शिवसेना नेते खा. संजय राऊत व संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर बडगुजर यांनी नाशिकच्या शिवसेना महानगरप्रमुखपदाची धुरा सांभाळल्यानंतर पूर्वाश्रमीचे सुनील बागूल, वसंत गिते आणि आता दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील यांची मोट बांधण्याचा यशस्वी प्रयत्न साध्य केला असून आता यापुढे आणखी कोणाकोणाचा नंबर लागतो, याबाबतची उत्सुकता नाशिककरांमध्ये यानिमित्ताने लागली आहे.
---
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.