सोमवारी दिसेल का शिवसेनेचा `तो` बंद म्हणजे बंद!

केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात राज्यात महाविकास आघाडीने उद्या सोमवारी बंद पुकारला आहे.
Maharashtra Bandh
Maharashtra BandhSarkarnama

नाशिक : केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात (Mahavikas Front call bandh on Tommarow against farmers law of Centre Government) राज्यात महाविकास आघाडीने उद्या सोमवारी बंद पुकारला आहे. या बंदला पुरोगामी संघटना व पक्षांनीही पाठींबा दिला आहे. (Various parties inclueding left supported this Bandh) मात्र आता लोकांना कडकडीत बंदचा विसार पडला आहे. त्यामुळे शिवसेनेचा एकेकाळी (Will people Experince Bandh of Shivsena like old days) दरारा असताना महाराष्ट्र बंद करावा तर तो फक्त शिवसेनेनेच असे म्हटले जाई. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा तो, `बंद म्हणजे बंद!` उद्या दिसेल काय याची चर्चा आहे.

Maharashtra Bandh
मनसे म्हणते युती करू...भाजपचे मात्र तोंडावर बोट!

कृषी कायद्यांविरोधात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस पक्षाने बंदचे आवाहान केले आहे. त्याला डाव्या पक्षांसह बहुजन शेतकरी संघटनेने पाठिंवा दिला आहे.

केंद्र शासनाच्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत वर्षापासून शेतकरी आंदोलनाला बसले आहे. वर्षभरात सहाशेवर आंदोलक शेतकऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. दिल्लीतील देशव्यापी शेतकरी आंदोलनाबाबत भाजपच्या केंद्र शासनाने तोडगा काढावा अशी अपेक्षा असतांना, उत्तर प्रदेशात भाजप मंत्र्याच्या मुलाकडून लखीमपूर दुर्घटना घडली. आंदोलनातील शेतकऱ्यांवर गाडी चालविल्याने चार शेतकऱ्यांचे मृत्यु झाले. शेतकऱ्याप्रती भाजप प्रणित केंद्र व उत्तर प्रदेशातील राज्य शासनाचे धोरण अन्यायकारक आहे. त्याविरोधात सामान्यांमध्‍ये जनजागृती करण्यासाठी सोमवारचा बंद असल्याचे महाविकास आघाडीच्या सूत्रांनी सांगितले.

Maharashtra Bandh
आमदार सरोज अहिरे शिवसेनेला खरोखर शिंगावर घेतील?

शांततेसाठी आवाहान

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत महाविकास आघाडीच्या तीन्ही राजकिय पक्षांनी बंदचा निर्णय घेतला, त्यानंतर नाशिकला शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाली. शनिवारी या नेत्यांनी नाशिकला पत्रकार परिषद घेउन शांततेत बंद पाळण्याचे आवाहान केले. त्यानंतर दोन दिवसांपासून तीन्ही पक्षांनी त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत शहर व जिल्ह्यात शांततेत बंद करण्याचे नियोजन केले. प्रत्येक भागात त्या-त्या भागातील महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित फिरुन नागरिकांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहान करतील.

बंद दरम्यान कुठल्याही प्रकारचा मोर्चा किंवा आंदोलन करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार उद्या सकाळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शहर जिल्ह्यातील प्रमुख भागात फिरुन शांततेत बंदसाठी आवाहन करतील.

बाजार समित्या बंद

सोमवारच्या बंदमध्ये बाजार समितीत्या कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय झाला. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बाजार समित्यावर बहुतांश ठिकाणी सत्ता आहे. शनिवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. त्यात, बाजार समित्यांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उद्याच्या बंदमध्ये जिवनाश्यक वस्तू वगळता भाजीमार्केट देखील बंद राहणार आहे.

कम्युनिस्ट पक्षांसह `सीटू`चा पाठिंबा

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला डावी आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व सीटू संघटनेने चा पाठिंबा दिला आहे. उत्तर प्रदेशात केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने सभेवरून परत जाणाऱ्या चार शेतकऱ्यांना व एका पत्रकारास गाडीखाली चिरडून ठार मारले. यासंदर्भात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घ्यावा, मंत्री पुत्रासह संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com