Pankaja Munde news: कुणासमोर कशासाठी झुकणार नाही; पंकजा मुंडेंचा रोख नक्की कुणाकडे...?

अलीकडच्या काळात पंकजा मुंडेंना पक्षात डावललं जात असल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात
Pankaja munde
Pankaja munde

Pankaja Munde News : ''आता आम्ही थकणार नाही. आता आम्ही रुकणार नाही. आम्ही कुणासमोर कशासाठीही झुकणार नाही.” असे सूचक वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या नाशिक मध्ये बोलत होत्या. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण शनिवारी (१८ मार्च) पार पडले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळही उपस्थित होते.  

पंकजा मुंडेंचं भाषण सुरू असतानाच पावसाची रिमझिम सुरु झाली. पाऊस सुरू होताच पंकजा मुंडेंनाही मोठा हुरूप आला. “गेल्या वेळी आपण भगवान भक्ती गडावर गेलो तिथेही जोरदार पाऊस आला. गोपीनाथ गडावरच्या कार्यक्रमावेळीही पावसाने हजेरी लावली. हा सतत येणारा पाऊस येणाऱ्या दिवसांसाठी शुभ शकून आहेत. या पावसाच्या प्रत्येक थेंबात ज्वाला आहे. ही ज्वाला तुमच्यात असणार आहे. आता आम्ही थकणार नाही. आता आम्ही रुकणार नाही. आम्ही कुणासमोर कशासाठीही झुकणार नाही.” अस सूचक वक्तव्य पंकजा मुंडेंनी (Pankaja munde) केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या हा रोख कुणाकडे होता, असा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे.

Pankaja munde
Shirur News : 'शिरूरमध्ये महाविकास आघाडी एकत्रित आली तरी...' ; आढळराव पाटील स्पष्टच बोलले!

अलीकडच्या काळात पंकजा मुंडेंना पक्षात डावललं जात असल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. तर कधी त्याही पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात फिरत असतात. बऱ्याचदा पक्षाच्या मोठ्या कार्यक्रमांमध्येही त्या दिसत नाहीत, त्यांच्या समर्थकांनी तर अनेकदा उघड नाराजी बोलून दाखवली आहे. त्यामुळे आजही त्यांच्या वक्तव्याचा नेमका रोख कुणाकडे होता, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी आपल्याच पक्षाचे कानही टोचले आहे. २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक होणार होतं. पण आता २०२४ च्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. हे अपयश कुणाचं, ते कोणी का नाही केलं हा मुद्दा महत्त्वाचा नाही, पण माझी विनंती आहे की माझं स्मारक बांधूच नका. पण तुम्ही एक काम करा, नाशिक, नगर, बीड, पुणे, मुंबईमध्ये आमच्या उसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृहे बांधा, त्यांच्या शिक्षणाची सोय करा, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com