महापौर उद्धव ठाकरेंचे नाही, किमान प्रविण दरेकरांचे तरी ऐकतील का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरपट्टी माफीची घोषणा केली आहे.
Mayor Satish Kulkarni

Mayor Satish Kulkarni

Sarkarnama

नाशिक : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नाशिक (Nashik) शहरातदेखील पाचशे चौरस फुटाच्या आतील घरांना घरपट्टीतून माफी देण्यासाठी प्रशासनावर राजकीय दबाव वाढत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thakre) सवलत देण्याची घोषणा केली आहे. त्यावर भाजप (BJP leader Pravin Darekar) नेते प्रविण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्याला तरी भाजपचे माहपौर प्रतिसाद देणार का? अशी चर्चा आहे.

<div class="paragraphs"><p>Mayor Satish Kulkarni</p></div>
भाजपचा व्हीप नाकारणाऱ्या २९ नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस

मुख्यमंत्र्यांनी घरपट्टी माफीची घोषणा केली. त्यावर मुख्यमंत्री मुंबईचे आहेत काय?. त्यांनी राज्यातील अन्य शहरांसाठीही घोषणा करावी अशी अपेक्षा भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली होती. यातील राजकीय विषय बाजुला सारला तरीही नाशिक, जळगाव, धुळे या महापालिकांत भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे येथील महापौर उद्दव ठाकरेंचे नाही तरी किमान भाजप नेते दरेकरांचे तरी एैकतील काय? असा प्रश्न आहे.

<div class="paragraphs"><p>Mayor Satish Kulkarni</p></div>
एका पत्राने वाचवले महापालिकेचे १७४ कोटी रुपये?

घरपट्टीत माफी आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेला राजकीय स्टंट रोखण्यासाठी प्रशासनाकडून पाचशे चौरस फुटाच्या आतील मिळकतींचा तक्ता तयार करून लेखाजोखा मांडण्याच्या सूचना विविध कर विभागाला देण्यात आल्या आहेत. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने मुंबईकरांना पाचशे चौरस मीटरच्या आतील घरांना घरपट्टी माफी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्या आश्‍वासनाची पूर्ती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेऊन केली.

मुंबई महापालिकेत घरपट्टी माफी देण्यात आल्याने नाशिक शहरातूनदेखील मागणीने जोर धरला. महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून महापौर सतीश कुलकर्णी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर घरपट्टी माफीचा प्रस्ताव महासभेवर सादर करण्याच्या सूचना विविध कर विभागाला दिल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे नाशिक महापालिका हद्दीतील पाचशे चौरस फुटांच्या सदनिकांची घरपट्टी माफ करण्याची मागणी केली.

प्रशासनावर घरपट्टी माफीसाठी दबाव येत असला तरी मुंबई व नाशिक महापालिकेची आर्थिक स्थितीत जमीन-अस्मानाचा फरक असल्याने शक्य नाही. नाशिकमध्ये पाचशे चौरस फुटाखालील मिळकतींची संख्या जवळपास चाळीस टक्के आहे. घरपट्टी माफी केल्यास करोडो रुपये महसुलाला मुकावे लागेल, अशी भीती निर्माण झाली. त्यात कोरोनामुळे घर, पाणीपट्टी वसुली पुरेशा प्रमाणात होत नसल्याने घरपट्टीला माफी नाही, अशीच भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. पाचशे चौरस फुटाच्या आतील मिळकतींची यादी सादर करण्यास विविध कर विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

सिडको, गावठाणात छोटी घरे

महापालिका हद्दीमध्ये सुमारे ४ लाख ५५ मिळकती आहेत. त्यातील सिडकोत तीनशे ते पाचशे चौरस फुटाच्या पंचवीस हजार मिळकती आहेत. जुने नाशिक, पंचवटीसह गावठाणात सव्वा लाखाहून अधिक मिळकती अशा आहेत, की त्यांची लांबी- रुंदी पाचशे चौरस फुटापर्यंत आहे. त्यामुळे घरपट्टी माफी दिल्यास महसूल मिळणार नाही. शिवाय पायाभूत सुविधा पुरविताना आर्थिक ताण सहन करावा लागेल. त्यामुळे तूर्त कुठल्याही परिस्थितीत घरपट्टीला माफी द्यायची नाही, अशीच भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आल्याचे समजते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com