Nana Patole: नाना पटोले देतील का नाशिक काँग्रेसला अध्यक्ष!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या यांच्या उपस्थितीत आज शहरात होणार आझादी गौरव पदयात्रा
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

नाशिक : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष झाल्यावर नाना पटोले (Nana Patole) दुसऱ्यांदा नाशिकला येत आहेत. या कालावधीत सातत्याने नाशिक (Nashik) शहर काँग्रेसच्या अध्यक्षांचा प्रश्न उपस्थित होतो. तीन प्रदेशाध्यक्ष बदलले मात्र नाशिकला अध्यक्ष मिळू शकलेला नाही. शहरात गलीतगात्र झालेली काँग्रेस नाना पटोलेंच्या खीजगणतीत तरी आहे का? असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत. (Nana Patole have a seriousness of Nashik city Congress)

Nana Patole
Sarthi: खासदार गोडसे, `सारथी`चे फुकटचे श्रेय लाटू नका!

महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आहेत. गेल्या निवडणुकीतही काँग्रेसला पुर्णवेळ अध्यक्ष नव्हता, यंदाही नाही. शहरातील पक्ष अध्यक्षांशिवाय चालविण्याचा विक्रम या पक्षाने केला आहे. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे दोन प्रदेशाध्यक्ष बदलले मात्र नाशिक शहराला अध्यक्ष मिळू शकलेला नाही. अशा स्थितीत नाशिक शहर काँग्रेस खरोखर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या खीजगणतीत तरी आहे का? असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत.

Nana Patole
Congress: विधानपरिषदेचे विरोध पक्षनेतेपद न मिळाल्याने कॉंग्रेसची नाराजी

यापूर्वी माजी नगरसेवक सय्यद मुशीर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र पटोले यांना नाशिकला येता आले नाही. मुशीर हे शिवसेनेत गेले तरी पटोलेंना त्याबाबत वेळ मिळाला नाही. माजी नगरसेवक गुरमितसिंग बग्गा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांना शहराध्यक्ष केले जाईल अशी चर्चा होती. मात्र प्रवेश झाला तरी अनेक महिन्यांपासून तो विषय रेंगाळलेलाच आहे. त्यामुळे खरोखर काँग्रेस पक्षाला संघटनात्मक परिस्थितीची जाणीव तरी आहे का असा गंभीर प्रश्न आहे.

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाचे आौचित्य साधत देशभरात आजादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूल मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलासबारू औताडे, प्रभारी ब्रिजकिशोर दत्त यांच्या नेतृत्वात पदयात्रा काढण्यात येणार आहे.

सकाळी साडेनऊ वाजता पाथर्डी फाटा येथून पदयात्रेस प्रारंभ होईल. त्यानंतर सिम्बायोसिस कॉलेज, उत्तम नगर, पवन नगर, सावतानगर, सिटीसेंटरमॉल, संभाजी चौक, कॅनडा कॉर्नर, राजीव गांधी भवन, सीबीएस, शालिमार, नेहरू गार्डन, शिवाजी रोड, शालिमार, मेनरोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅन्डवरून रामकुंडावरील महात्मा गांधी ज्योत येथे पदयात्रेचा समारोप होईल.

पदयात्रेत सर्व आजी माजी खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, नगरसेवक, सेवादल, महिला काँग्रेस, एनएसयूआय, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभाग आदी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे आदींनी केले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com