अभिनेत्री केतकी चितळेची महाराष्ट्रभर परेड होणार?

नाशिक पाठोपाठ धुळेसह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
Kataki chitale & NCP agitation
Kataki chitale & NCP agitationSarkarnama

शिंदखेडा : राष्ट्रवादीचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या व फॉरवर्ड करणाऱ्यांचा जाहीर निषेध करीत विविध शहरांत काल देखील आंदोलन झाले. धुळे (Dhule) येथे गुन्हा दाखल झाला. विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाल्याने केतकी चितळेची (Ketaki Chitale) महाराष्ट्र परेड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती चांगलीच अडचणीत येणार, असे चित्र आहे. (Ketaki Chitle came in trouble for her tweet on Sharad Pawar)

Kataki chitale & NCP agitation
राज ठाकरे म्हणाले, निर्धास्त रहा, मी तुमच्या पाठीशी!

दरम्यान केतकी चितळे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत पारोळा, पाचोरा, चिमठाणे, देवळा आदींसह विविध शहरात काल आंदोलन झाले. विविध पोलिस ठाण्यांत तीच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याने नवी मुंबई पोलिसांची कोठडी संपल्यावर तीचा ताबा घेण्यासाठी अन्य पोलिस मागणी करणार का यासह अन्य पोलिसांनीही तशीच मागणी केल्यास केतकी चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे. तीची महाराष्ट्रभर परेड होऊ शकते.

Kataki chitale & NCP agitation
'सदाभाऊ खोतांनी भाजपलाच शालीतून जोडा लगावला आहे...!'

शिंदखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांचे नेतृत्वाखाली शिंदखेडा पोलिसांना निवेदन देत वरपाडा चौफुलीवर अभिनेत्री केतकी चितळेच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन, घोषणा देण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा, तालुकाध्यक्ष कैलास ठाकरे, शहराध्यक्ष प्रवीण पाटील, युवक जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे, ज्योती मराठे, प्रशांत देसले, दुर्गेश पाटील, राम कुवर, दीपक जगताप, चिराग माळी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.निवेदनात म्हटले आहे, की केतकी चितळे या महिलेने खासदार शरद पवार यांच्याबाबत ट्विटर आणि फेसबुक वर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन एक कविता पोस्ट केली, त्यातून शरद पवार यांचा अवमान झाल्याचे दिसून आले. शरद पवार देशाचे नेते आहेत. त्यांचे राज्याच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे.

महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गती देऊन त्यांनी लोक विकासाची सातत्याने कामे केली आहे. धोरणात्मक निर्णयांमध्ये देशाला दिशा देणारे ते एक नेते ठरले आहे. त्यांच्यावर विकृत कविता केतकी चितळे या महिलेने पोस्ट केली असून ही कविता नितीन भावे यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे केतकी चितळे आणि नितीन भावे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा असे निवेदनात म्हटले आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com