जळगावच्या निवडणुकीत यंदाही ‘अर्थ’पूर्ण लढत होईल?

विधान परिषदेची निवडणुक सहा महिन्यांवर येऊन ठेपल्याने लोकप्रतिनिधींना उत्सुकता.
Jalgaon Munciple corporation Building, Jalgaon News, Jalgaon Latest Marathi News
Jalgaon Munciple corporation Building, Jalgaon News, Jalgaon Latest Marathi NewsSarkarnama

जळगाव : प्रतिष्ठा अन्‌ चुरशीसह ‘अर्थ’पूर्ण लढतीची परंपरा लाभलेल्या विधान परिषदेच्या जळगाव (Jalgaon) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी (MLC election) सहा महिन्यात निवडणूक होतेय.. पण, त्याआधी जिल्हा परिषदेसह (ZP) १४ नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका होणार असून त्यात निवडून येणारे सदस्य या जागेसाठीचा आमदार ठरविणार आहे. (Who will decide Jalgaon MLC upcoming election candidates)

Jalgaon Munciple corporation Building, Jalgaon News, Jalgaon Latest Marathi News
साक्रीच्या राजकारणात रोहित पवारांची एंट्री?

विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आलेले आमदार चंदू पटेल यांची मुदत येत्या ऑक्टोबरमध्ये संपत आहे. त्यामुळे या जागेसाठी येणाऱ्या सहा महिन्यांत निवडणूक होणार आहे. (Jalgaon Latest Marathi News)

Jalgaon Munciple corporation Building, Jalgaon News, Jalgaon Latest Marathi News
धक्कादायक; आमदारांनी नव्हे, कंत्राटदारांनी आणला १८ कोटींचा निधी?

‘अर्थ’पूर्ण परंपरा

जळगावातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ही जागा निवडून द्यायची असून आतापर्यंतचा इतिहास पाहता ही निवडणूक नेहमीच अत्यंत रोमांचक, चुरशीची व ‘अर्थ’पूर्ण झाली आहे. तत्कालीन प्रतिस्पर्धी डॉ. गुरुमुख जगवानी व ए.टी. पाटील, मनीष जैन व निखिल खडसे, चंदू पटेल व विजय भास्करराव पाटील अशा ‘हेवीवेट’ लढतींचा या निवडणुकीला इतिहास आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून असते.

त्याआधी पालिका निवडणुका

अर्थात, या निवडणुकीच्या आधी जिल्हापरिषद, पंचायत समिती व जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका होतील. या निवडणुकांमध्ये निवडून येणारे नवनिर्वाचित सदस्य विधान परिषदेचा नवा आमदार ठरविणार आहेत.

सातशे मतदार

पालिकांच्या हद्दीतील प्रभागांची पुनर्रचना, हद्दवाढीनुसार वाढलेली संख्या, जिल्हा परिषद सदस्यांची प्रस्तावित वाढीव संख्या असे सुमारे सातशे सदस्य या निवडणुकीसाठीचे मतदार असतील. गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीपेक्षा विधान परिषदेसाठी या वेळी तब्बल ६० पेक्षा अधिक मतदार वाढलेले आहेत. नवनिर्वाचित सदस्यांसह स्वीकृत सदस्य अशी ही एकूण मतदार संख्या जवळपास ६९४ झालीय.

पाचशेवर नवे सदस्य

जिल्ह्यात येणाऱ्या काळात जिल्हापरिषद, पंचायत समितीसह १४ पालिकांची निवडणूक होणार आहे. या सर्व संस्थाची मुदत याआधीच संपली असून त्यावर प्रशासकांचा कारभार सुरु आहे. जिल्हापरिषदेतून नव्याने वाढ झालेल्यांसह ७७, पंचायत समिती सभापती १५ व पालिकांमधून निवडून येणारे ४३३ नवे सदस्य असे एकूण ५२५ नवनिर्वाचित सदस्य विधान परिषदेसाठीचे मतदार होतील व या जागेसाठीची आमदारकी ठरवतील.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com