दीपक पांडे अडचणीत?; ख्रिस गेल सोबतचा डान्स भोवणार?

दीपक पांडे यांच्यावर कारवाईची मागणी करणारे ट्वीट नीरज गुंडे यांनी केले गृहमंत्र्यांना टॅग केले आहे.
दीपक पांडे अडचणीत?; ख्रिस गेल सोबतचा डान्स भोवणार?
Deepak Pandey & chris gayleSarkarnama

मुंबई : वरिष्ठ पोलिस अधिकारी दीपक पांडे (Deepak Pandey) वेस्ट इंडीजचे क्रीकेटपटू ख्रीस गेल (Khris Gyel) यांच्या सोबत गीलच्या खास शैलीत नृत्य करीत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. तो चर्चेत असल्याने दीपक पांडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वादग्रस्त नीरज गुंडे (Niraj Gunde) यांनी केली आहे. त्यामुळे श्री. पांडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Dancing deepak pande with west indies cricketier Khris gyel vedio viral)

Deepak Pandey & chris gayle
चंद्रकांतदादा तुम्हीही मसणात जाणारच आहात ना!

दोन दिवसांपूर्वी दक्षीण मुंबईतील एका तारांकीत हॅाटेलमध्ये ख्रीस गेल गेला होता. तेथे उपस्थितांच्या आग्रहातून त्यांनी आपल्या क्रिकेटच्या मैदानावरील गाजलेली मुद्रा असलेले चर्चीत नृत्य केले. त्यात अनेक जन सहभागी झाले. त्यात पोलिस अधिकारी दीपक पांडे देखील आहेत.

Deepak Pandey & chris gayle
फडणवीस, भाजपचा संघटनमंत्री तरी ओबीसी करून दाखवा!

सध्या मुंबईत महिला आणि अनुसूचीत जाती अत्याचर प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून श्री. पांडे सध्या मुंबईत कार्यरत आहेत.

यावेळी ते रात्रीच्या वेळी फॅार्मल ड्रेसमध्ये नृत्य करताना दिसत आहेत. त्यामुळे ऑनड्यूटी आहेत की नाही हे स्पष्ट होत नाही. मात्र नीरज गुंडे यांनी हा व्हीडिओ टॅग करून याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ट्वीटद्वारे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. त्यामुळे ख्रीस गेल सोबतच्या नृत्याने ते अडचणीत येणार काय, याची चर्चा आहे.

कोण आहेत दीपक पांडे...

भारतीय पोलिस सेवेतील वरीष्ठ अधिकारी असलेले दीपक पांडे यांनी राज्यातील विविध महत्वाच्या पदांवर काम केले आहे. नुकतीच त्यांची नाशिकचे पोलिस आयुक्त पदावरून मुंबईला बदली झाली आहे. महसूल न्यायाधिकरणाच्या कामकाजाबाबत त्यांनी आक्षेप घेत हे अधिकार काढून घ्यावेत. त्याला पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, अशी सुचना करीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना लिहीलेल्या पत्रात महसुल अधिकारी हे आरडीएक्स आहेत असा उल्लेख त्यांनी केला होता. त्यावर राज्यभर महसूल अधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते.

कोण आहेत नीरज गुंडे...

नीरज गुंडे यांचे नाव मुंबईतील ड्रग्ज प्रकरणावरून उठलेल्या राजकीय वादळात त्यांचे नाव मंत्री नवाब मलिक यांनी पुढे आणले होते. श्री. गुंडे हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घनीष्ठ संबंध असलेली व्यक्ती असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. श्री. गुंडे यांचे वडील तसेच अत्या या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत असल्याची चर्चा आहे. त्यातूनच त्यांचे भाजप व संघाच्या विविध नेत्यांशी संपर्क आल्याचे बोलले जाते.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in