Rajvardhan Kadambande News: `या`मुळे आगामी निवडणुका भाजपच जिंकेल!

राजवर्धन कदमबांडे यांच्या उपस्थितीत मिल परिसरात आयुष्यमान भारत कार्डवाटप
Rajvardhan Kadambande in Dhule Programme.
Rajvardhan Kadambande in Dhule Programme.Sarkarnama

Dhule News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राज्याचे (Maharashtra) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) अनेक लोकोपयोगी योजना अमलात आणत आहेत. त्यामुळे शहरासह राज्याच्या विकासासाठी आगामी निरनिराळ्या निवडणुकांमधून पुन्हा एकदा भाजपच्या (BJP) पाठीशी खंबीरपणे राहावे. भाजपला विजयी करायचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी केले, (PM Narendra Modi implimenting Usefull schemes)

शहरातील मिल परिसरातील शाळा क्रमांक २८ च्या प्रागंणात मिल परिसरात आयुष्यमान भारत योजनेच्या आभा कार्डचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी कदमबांडे बोलत होते.

Rajvardhan Kadambande in Dhule Programme.
Shivsena News: दादा भुसेंच्या मतदारसंघात परिवर्तन होईल?

केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार समाजातील प्रत्येक घटकांसाठी विकासाचा दिर्घकालीन व मुलभूत विकासाचा कार्यक्रम घेऊन काम करीत आहे. त्याची अंमलबजावणी अतिशय प्रभावीपमे होत आहे. लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व पक्षाचे कार्यकर्ते त्यात सहभागी होत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्याची जाणीव असल्याने आगामी निवडणुकांत भाजप निश्तिपणे जिंकेल यात शंका नाही.

श्री. कदमबांडे पुढे म्हणाले, की आगामी निवडणुकांमध्ये भाजप जो कुणी उमेदवार देईल, त्याच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे आणि निवडून द्यावे. श्री. नवले म्हणाले, की शहरातील मिल परिसर कष्टकरी आणि गरिब घटकाचा आहे. या भागात नेमाने परिवाराचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यात आयुष्यमान भारत योजनेतील पात्र लाभार्थी शोधून त्यांना मोफत कार्डवाटप केले जात आहे.

Rajvardhan Kadambande in Dhule Programme.
BJP News: आमदार दिलीप बोरसे यांनी रस्त्यांसाठी आणले १५ कोटी

खासदार डॉ. सुभाष भामरे, श्री. कदमबांडे, मनपा माजी स्थायी सभापती शीतल नवले, माजी नगरसेविका माधवी नेमाने, नगरसेविका सुरेखा उगले, राजू सोनवणे, भीमा उदीकर, माजी नगरसेवक तुषार पाटील उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in