जळगावच्या आयुक्तांच्या नियुक्तीत पालकमंत्री गुलाबराव पाटील काय ‘किमया’ करणार?

जळगाव महापालिका निवृत्तीचे ‘हिल’स्टेशन झाले काय?
जळगावच्या आयुक्तांच्या नियुक्तीत पालकमंत्री गुलाबराव पाटील काय ‘किमया’ करणार?
Gulabrao PatilSarkarnama

कैलास शिंदे

जळगाव : महापालिकेचे (Jalgaon) आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी (Dr. Satish Kulkarni) शनिवारी निवृत्त होत आहे. जळगावात निवृत्त होणारे हे तिसरे आयुक्त आहेत. त्यामुळे जळगाव महापालिका Municiple corporation) अधिकाऱ्यांना शांतपणे निवृत्त होण्यासाठी ‘हिल’स्टेशन आहे. असे चित्र निर्माण होऊ पहात आहे.

Gulabrao Patil
इच्छुक म्हणतात, भाजप-मनसे युती हाच पर्याय!

जळगावकरांपुढे विकासकामांचे अनेक प्रश्‍न आहे, त्यात हा एक ‘प्रश्‍न’ जटिल होईल. त्यामुळे निवृत्तीचा काळ अधिक असलेले आणि जळगावात आपण चांगले प्रकल्प राबवून ‘प्रमोशन’ मिळवू, अशी अपेक्षा असलले आयुक्त नियुक्त केल्यास जळगावात नावीन्यतेला चालना मिळेल, पालकमंत्री गुलाबराव पाटील नवीन आयुक्त नियुक्तीत काय ‘किमया’ करतात, याकडेच लक्ष असणार आहे.

Gulabrao Patil
आर्थिक विषमता हटविण्याची क्षमता केवळ सहकारात!

स्थानिक स्वराज्य संस्थेत शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाके असतात, ती मिळून गाव, शहर व महानगराच्या विकासाचे प्रश्‍न मार्गी लागत असतात. महापालिकेत आयुक्त आणि सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी यांचा समन्वय झाल्यास नागरी समस्या सोडविण्यास अडचण येत नाही, शिवाय नवीन प्रकल्पाचे प्रस्तावही मंजूर होऊन मार्गी लागतात. विकासाच्या निधीचा प्रश्‍न आपोआपच मिटला. कारण राज्यात आणि महापालिकेत एकच पक्ष सत्तेत असल्यास शासनाकडून निधी मिळण्यास फारशी अडचण येत नाहीत. सध्या महापालिकेची ही बाजू भक्कम आहे. त्यामुळे सध्या तरी जळगावात रस्त्याची कामे सुरू असल्याचे दिसत आहे.

सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात जळगावात समन्वय आहे. मात्र जळगावात नावीन्यतेचे काहीच दिसत नाही. जळगाव रस्ते, गटारी, कचऱ्याची विल्हेवाट या समस्येभोवतीच फिरत आहे, याला कारण जळगावाचे आयुक्तपदही आहे. सद्यःस्थितीत जळगावचे चित्र असे झाले आहे, की निवृत्ती जवळ आलेले आयुक्त जळगावला दिले जात आहेत. डॉ. सतीश कुळकर्णी जळगावात महापालिकेत निवृत्त होणारे तिसरे आयुक्त आहेत.

त्यामुळे जळगाव महापालिका आता अधिकाऱ्यांना निवृत्तीसाठी ‘राखीव’ असलेली महापालिका आहे की काय? असे चित्र निर्माण झाले असेल, तर ते जळगावच्या विकासाच्या हिताचे नाही. कारण निवृत्तीचा कालावधी जवळ असलेले अधिकारी ‘चलता है’ यानुसार काम करीत असतात. कारण त्यांना ‘काम दाखवून’ पुढे प्रमोशन मिळवायचे नसते. त्यामुळे नवीन प्रकल्पाच्या नियोजनात ते फार ‘रिस्क’ही घेत नाहीत. या उलट काही तरी नवीन करून दाखवून पुढे प्रमोशन मिळेल, या अपेक्षेने काम करणारे उमेद असलेले अधिकारी नियुक्त झाल्यास शहर विकासाच्या कामाला निश्‍चितच गती मिळते, शिवाय एखादा नवीन प्रकल्प उभा राहतो. त्यामुळे आता महापालिका आयुक्त नियुक्त करताना निवृत्ती जवळ आलेले अधिकारी नियुक्त न करता, सेवेचा जास्त कालावधी असलेले आयुक्त नियुक्त करावेत.

निवृत्तीच्या कालावधीचे दिवस न मोजता आपण सेवेच्या कालावधीत जळगावात चांगले काम करून पुढे दुसऱ्या ठिकाणी प्रमोशन मिळविण्याचे अपेक्षा असलेले अधिकारी नियुक्त करावेत. शिवाय जळगाव महापालिका अधिकाऱ्यांना निवृत्तीसाठी ‘राखीव’ असल्याचे चित्रही निर्माण होणार नाही.

जिल्ह्यात एखादा अधिकारी नियुक्त करावयाचा असल्यास त्या-त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा ‘हिरवा’ सिग्नल घेऊन नियुक्ती दिल जाते, असे म्हणतात. त्यामुळे जळगावचे नवे आयुक्त नियुक्त करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील या बाबीकडे लक्ष ठेवून निवृत्तीचा जास्त कालावधी असलेले आयुक्त नियुक्त करतील? हेच आता पाहणे गरजेचे आहे, नाही तर निवृत्तीला वर्ष-दीड वर्षे असलेले आयुक्त नियुक्त केल्यास पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या...’, असे चित्र निर्माण होईल.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.