शंभर खून झाल्यावर पोलिस जागे होणार का?

आमदार सीमा हिरे यांची अंबड पोलिस स्टेशनच्या विभाजनासाठी शासनाकडे मागणी.
शंभर खून झाल्यावर पोलिस जागे होणार का?
MLA Seema Hire News, Nashik Crime News, Nashik Latest Marathi NewsSarkarnama

नाशिक : उद्योजक नंदकुमार आहेर यांच्या खुनाचे (murder) पडसाद शहरभर (Nashik) उमटत आहेत. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे (Seema Hire) यांनी शंभर खून झाल्यानंतर अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करणार का असा थेट सवाल राज्य शासनाला केला आहे. (State Government should splits Ambad Police station)

MLA Seema Hire News, Nashik Crime News, Nashik Latest Marathi News
रायगडावर गेलेले आमदार मंगेश चव्हाण जमिनीवरच झोपले!

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजक नंदकुमार आहेर यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला करून त्यात त्यांचा मृत्यू झाला, त्या पार्श्वभूमीवर आमदार हिरे यांनी माध्यमांशी संवाद साधतांना कायदा व सुव्यवस्थेचे बद्दल अनेक प्रश्न निर्माण केले. (Nashik Latest Marathi News)

MLA Seema Hire News, Nashik Crime News, Nashik Latest Marathi News
भाजप आमदार सुरेश भोळे यांनी एक रस्ताही केला नाही!

त्या म्हणाल्या, दिवसाढवळ्या अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या करून उद्योग नगरीमध्ये कामगार व उद्योजक यांच्यामध्ये प्रचंड दहशत निर्माण केली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. अनेक दिवसांपासून शहरात खून सत्र चालू असून शहरामध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या २० दिवसामध्ये ८ खून झाले असून अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी अधिक दक्ष राहून धोक्याच्या ठिकाणी गस्ती वाढवल्या पाहिजे.

त्या पुढे म्हणाल्या, योग्य त्या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना सुरू करायला हव्यात कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता नागरिकांच्या जीविताला संरक्षण मिळणे यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड करता कामा नये. अंबड पोलिस ठाण्याच्या विभाजनाची वारंवार मागणी करून देखील शासन दरबारी त्या बाबत कुठलीही अंमलबजावणी झाली नाही. पत्र व्यवहार केल्यानंतर अंबड पोलिस ठाणे हद्दीमध्ये गुन्हेंची संख्या व प्रमाण कमी असल्यामुळे तेथे पोलिस ठाणे विभाजनाचे कारण नाही, असे कळविण्यात आले.

मतदार संघामध्ये वाढती गुन्हेगारी घडत असलेले गुन्हे यांचा गांर्भीयाने विचार केला असता अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन होणे अंत्यत आवश्यक असून १०० खून झाल्यावर राज्य सरकार अंबड पोलिस स्टेशनचे विभाजन करणार का? असा सवाल आमदार हिरे यांनी केला.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in