गिरीष महाजन, गुलाबराव पाटील खडसेंच्या चक्रव्युहात अडकले?

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपने प्रतिष्ठेची केली.
Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao Patil
Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao PatilSarkarnama

जळगाव : जिल्हा (Jalgaon) दूध संघाच्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) विरुद्ध महाविकास आघाडी पॅनल, (Mahavikas Aghadi) तर विद्यमान मंत्री गिरीश महाजन, (Girish Mahajan) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या नेतृत्वात भाजप-(BJP) शिंदे गट (Eknath Shinde Group) पॅनल अशी लढत होत आहे. ही निवडणूक जळगावची असली तरी त्याची चर्चा राज्यभर होत आहे. विरोधी पक्षातील खडसे यात एकट्याच्या बळावर आव्हान देत आहेत. दुसरीकडे सरकारी यंत्रणेचा छुपा पाठींबा, शिंदे गट व भाजपची यंत्रणा घेत निवडणुकीत उतरलेल्या गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या पॅनेलला दगाफटका झाल्यास ते खडसेंच्या चक्रव्युहात अडकतील. (NCP leader Eknath khadse is fight alone with two ruling party ministers in Milk Fedration election)

Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao Patil
Maharashtra politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर होणारी आजची सुनावणी पुन्हा लांबणीवर!

यात आता दोन मंत्री, आमदार व माजी आमदार यांची काट्याची लढत आहे. राष्ट्रवादीचे पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ बिनविरोध झाले आहेत. मात्र ते भाजप शिंदे गटात सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनीही भाजप-शिंदे गटातून आपली उमेदवार जाहीर केली आहे.

Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao Patil
Nitin Gadkari : रोडकरी नंतर आता नितीन गडकरी झाले स्पायडरमॅन !

दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे जिल्हा दूध संघात असलेल्या निवडणूक कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. दुपारी एकपर्यंत फारशी गर्दी नव्हती. त्यांनतर मात्र माघार घेणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. दुपारी तीननंतर प्रवेशद्वार बंद करून घ्यावे लागले.

‘राष्ट्रवादी’चे वाघ शिंदे-भाजप गटात बिनविरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाचोरा येथील माजी आमदार दिलीप वाघ हे एकमेव पाचोरा मतदार संघातून बिनविरोध झाले आहेत. ते अगोदर महाविकास आघाडी पॅनलमध्ये होते, मात्र बिनविरोध होताच त्यांनी शिंदे -भाजप गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता शिंदे भाजप गटाने वाघ यांच्या बिनविरोधच्या माध्यमातून संचालकपद विजयाचा श्रीगणेशा केला आहे. वाघ यांच्या विरोधात शिंदे-भाजप गटाचे आमदार किशोर पाटील यांनी माघार घेतली आहे.

गिरीश महाजन, गुलाबराव मैदानात

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या मैदानात राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रथमच मैदानात उतरले आहेत. त्यांची सरळ थेट एकास एक लढत होत आहे. जामनेर तालुक्यातून मंत्री महाजन यांच्या विरोधात नेरी येथील माजी सरपंच दिनेश पाटील लढत देत आहेत, तर जळगाव तालुक्यातून मंत्री पाटील यांच्या विरोधात जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सासूबाई तसेच शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या मातोश्री मालतीबाई महाजन लढत देत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com