Eknath Khadse; दूध संघांत गिरीश महाजनांची एंट्री खडसेंना परवडेल का?

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीत राजकीय वर्चस्वाची टोकाची लढाई
Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath KhadseSarkarnama

जळगाव : राज्यात महाविकास आघाडीचे (mahavikas-aghadi) सरकार कोसळल्यानंतर अनेक जिल्ह्यांत टोकाची राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीपासून तर लहान सहान संस्थांतही तीव्र राजकीय संघर्ष दिसून येतो. जळगावमध्ये (Jalgaon) महाविकास आघाडीचे एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील संघर्ष याच वळणावर आहे. त्यामुळे दूध संघात भाजपचे (BJP) नेते, मंत्री गिरीश महाजनांची एंट्री खडसेंना परवडेल का? ही चर्चा जोरात आहे. (Eknath Khadse has to stop Minister Girish Mahajan in Milk federation election)

Girish Mahajan & Eknath Khadse
Bharat Jodo Yatra : राहुल गांधीच्या यात्रेत सहभागी झाल्याने शिक्षकावर निलंबनाची कारवाई : काँग्रेसची टीका!

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष खडसेंबरोबर दिसतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्यात गिरीश महाजन यशस्वी झालेले दिसता. ही सहकाराची निवडणूक आहे. त्यात मोजके मतदार असतात. त्यांच्यात राजकीय पक्षापेक्षा व्यक्तीगत सोय, सत्तेशी लगट आणि लक्ष्मी दर्शन याचा प्रभाव दिसतो. यामध्ये दोन मंत्री व आर्थिकदृष्ट्या सक्षम भाजप यापुढे खडसे कशी टक्कर देतात, याची उत्सुकता असेल.

Girish Mahajan & Eknath Khadse
Uddhav Thackrey: लांबलेल्या महापालिका निवडणुकीचा ठाकरे गटाला धोका

या स्थितीत जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांचे आव्हान आमदार एकनाथराव खडसे मोडून काढतील, असे बोलले जात आहे. निवडणुकीवरील स्थगिती उठविली असून, १० डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी पुन्हा सुरू झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांची जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत युती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनल आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आहे. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकीत खऱ्या अर्थाने ‘राजकीय’ वर्चस्वाची लढाई होत आहे.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय लढाई सुरू आहे. दूध संघात एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. राज्यात सत्तातंर झाल्यानंतर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पदभार घेतला. मात्र, त्यावर खडसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने प्रशासक मंडळ अवैध ठरवून संचालक मंडळाकडेच कारभार दिला.

प्रशासकपदाचा कारभार हाताशी असताना, मंगेश चव्हाण यांनी संघातील माहिती घेऊन संघात अखाद्य तूप व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. मात्र, याप्रकरणी खडसे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने आरोप फेटाळून लावला व ही चोरी झाली आहे. याप्रकरणी कार्यकारी संचालकाच्या माध्यमातून पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. मात्र, फिर्याद घेण्यात आली नाही. त्यासाठी खडसे यांनी पोलिस ठाण्याबाहेर आंदोलनही केले. त्यानंतर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी त्या तक्रारीनुसार कार्यकारी संचालकासह काही जणांना अटक केली. दूध संघ निवडणुकीअगोदर ही पहिली राजकीय लढाई दूध संघात सुरू झाली. संघात दुसरी राज्यातील सत्ताधारी गट व विरोधी गटाची प्रशासकीय डावपेचाची लढाई झाली. आता तिसरी राजकीय लढाई सुरू झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकारचे सहकार पॅनल आहे, तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनल आहे. दोन्ही गटांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली आहे.

मंत्री महाजन यांच्या गटात दोन मंत्री विद्यमान आमदार, माजी आमदार आहेत. तर श्री. खडसे यांच्या गटातही आमदार, माजी आमदार व माजी मंत्री आहेत. राज्यात सत्तातंर झाले. त्यातच शिवसेना फुटली. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे चार आणि पुरस्कृत एक, असे पाच आमदार फुटले आहेत. या फुटलेल्या आमदारांनीही आता शिंदे- भाजप गटात आपली ताकत लावली आहे. जिल्हा दूध संघात ४४३ मतदार आहेत. मतदार कमी असले, तरी संपूर्ण जिल्ह्यातून मतदान आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीची ही राजकीय रंगीत तालीम मानली जात आहे.

दरम्यान, शिवसेना फुटल्यानंतर ही निवडणूक होत आहे. वास्तविक एवढ्या मतदारावर पक्षीय ताकद जोखली जात नसली, तरी एक वातावरणाचा कल कळून येतो. त्यामुळे आपले अधिपत्य दाखविण्यासाठी आता महाविकास आघाडी व भाजप-शिंदे गट सज्ज आहे. या लढाईमुळे जिल्ह्यातील राजकीय कल दिसून येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com