Eknath Khadse News; पदवीधर निवडणुकीत नाथाभाऊ, सक्रीय होतील का?

नाथाभाऊ सध्या मुंबईत असल्याने समर्थक आणि कार्यकर्तेही संभ्रमात
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama

जळगाव : (Jalgaon) नाशिक (Nashik) विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम जोरात आहेत. यासंदर्भात काँग्रेसच्या (congress) उमेदवारीबाबत गोंधळ झाल्यानंतर आज महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) याबाबत आपला निर्णय जाहीर होईल. मात्र यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख नेते असलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) फारसे चर्चेत नाहीत. त्यामुळे ते केव्हा सक्रीय होणार याची उत्सुकता आहे. (NCP leader eknath Khadse is in Mumbai now a days)

Eknath Khadse
Dr Amol kolhe; खासदार कोल्हे रमले `शिवपुत्र संभाजी महानाट्या`च्या प्रचारात

महाविकास आघाडीच्या दृष्टीने नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. याबाबत डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनेने मुळच्या भाजपच्या असलेल्या शुभांगी पाटील यांनी पाठींबा जाहीर केला आहे. दुसरीकडे सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना भाजप पाठींबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यात एकनाथ खडसे यांची भूमिका महत्त्वाची ठरेल.

Eknath Khadse
Nashik Graduate election; आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी होणार!

कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या नेहमीच संपर्कात असलेले, तसेच एकाच रिंगमध्ये फोन घेणारे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’असल्याने कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. नाथाभाऊ नक्की गेले कुणीकडे, असे कार्यकर्ते विचारू लागले आहेत, त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत खडसे सक्रीय होतील की नाही, याची उत्सुकता वाढली आहे.

आमदार एकनाथ खडसे हे कायम कायकर्त्यांच्या संपर्कात असतात, कधी कधी तर ते स्वत:हून कार्यकर्त्यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा करीत असतात. मात्र गेल्या आठ दिवसांपासून त्यांचा फोन संपर्कात नसल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. एकनाथ खडसे आठ दिवसांपूर्वी नियमित तपासणीसाठी मुंबईत गेले होते. त्या वेळी त्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्कही झाला होता. त्यानंतर मात्र गेल्या सहा-सात दिवसांपासून त्यांचा फोन संपर्कक्षेत्रात नसल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत त्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँगेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की नाथाभाऊ मुंबई येथे गेलेले असताना त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांच्या पायाची नसवर नस चढल्यामुळे त्यांना चालणे कठीण झाले. त्यानंतर त्यांनी बाँबे हॉस्पिटलमध्ये तीन दिवस उपचार घेतले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरीच विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे ते मुंबईतच आपल्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. त्यांनी मोबाईलही स्वीच ऑफ केल्याचे त्यांनी सांगितले. आपला तीन-चार दिवसांपासून संपर्क झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली, त्या ठिकाणी ते विजयी झाले. पक्षातर्फे अद्याप संधी दिलेली नाही. मात्र कायम कार्यकर्ते व जनतेच्या संपर्कात असणारे खडसे यांची संपर्क क्षेत्राबाहेर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत, आता याबाबत खडसे यांच्याशी संपर्क झाल्यानंतरच खुलासा होऊ शकेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in