धुळे महापालिकेतील टक्केवारी संस्कृतीचा सोक्षमोक्ष लागेल का?

महापालिका व आमदारांमध्ये ३० कोटींच्या निधीवरून बेबनाव कायम आहे.
Dhule Municiple corporation
Dhule Municiple corporationSarkarnama

निखिल सूर्यवंशी

धुळे : शहरात (Dhule) ३० कोटींच्या निधीवरून महापालिकेतील (Municiple corporation) सत्ताधारी भाजपसह (BJP) नेते विरुद्ध एमआयएमचे (AIMIM) आमदार फारुक शाह (Faruk Shah) यांच्यात पत्रकाद्वारे शाब्दीक चकमकी सुरू आहेत. असे असताना नुकत्याच झालेल्या महासभेत आमदारांचे टक्केवारीचे (Percentage culture) रेट माहिती असून यासंबंधी आमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहेत, असे विधान करत भाजपच्या (BJP) जबाबदार पदाधिकाऱ्याने खळबळ उडवून दिली आहे. (Ruling BJP`s leader given a shocking statement on Commission)

Dhule Municiple corporation
विमानसेवा गुजरातने पळवली?; खासदार काही बोलेना!

या विधानाविषयी आमदार किंवा त्यांच्या समर्थकांनी अद्याप खंडन केल्याचे ऐकिवात नाही. शहरासह जिल्ह्यात टक्केवारी मुद्दा अधूनमधून डोके वर काढत असतो. याविषयी सोक्षमोक्ष लागला पाहिजे, अशी अपेक्षा सामान्य धुळेकर व्यक्त करतात.

Dhule Municiple corporation
सुषमा अंधारे जोमात अन् सत्ताधारी एकनाथ शिंदे गट कोमात!

जिल्ह्यासाठी अपहार, भ्रष्टाचार, टक्केवारी, चिरीमिरी, खाबूगिरी आदी शब्द काही नवीन नाहीत. किंबहुना, नंदुरबार, शिरपूर, जळगाव, नाशिक शहरासह तुलनेत धुळे शहर व जिल्ह्याची विकासाशी स्पर्धा करताना दमछाक होते आहे. राज्य सरकारने १९९५ मध्ये भुजंगराव कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेत स्थापन केलेल्या राज्य मागास गटाच्या अहवालात पूर्वी एकत्रित असलेला धुळे व नंदुरबार जिल्हा भ्रष्टाचारात बरबटलेला असून त्यामुळे विकासाची गती मंद असल्याचा परखड निष्कर्ष मांडण्यात आला. यातून बोध घेण्याऐवजी सद्यःस्थितीत धुळे शहर व जिल्ह्याच्या सभोवताली चौफेर असलेल्या अन्य जिल्ह्यातील शहरांचा विकास बघितला, तर आपली नेमकी स्थिती काय हे नव्याने सांगण्याची गरज नसावी.

इतर शहरांपेक्षा मागे का?

धुळे शहर आजही एक दिवसाआड पिण्याचे पाणी, चांगले रस्ते, गटारी, पथदिवे, स्वच्छता आदी मूलभूत सोयीसुविधांसाठी तरसते आहे. अनेक प्रकल्प मुबलक निधी खर्च होऊनही मार्गी लागलेले नाहीत. शहराचा विकास फक्त रस्ते व बांधकामाभोवतीच गुरफटला आहे. मनोरंजन, चांगले मॉल, व्यावसायिक संस्था येणे, दर्जात्मक शिक्षण, उद्योग- व्यावसायिक स्पर्धेतून रोजगाराचीनिर्मिती आदी विषय सर्वपक्षीय नेते व महापालिकेपासून दूर असल्याचा अनुभव धुळेकर घेत असतात. यासाठी लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा, पायाभूत सुविधांच्या विकासासह बळकटीकरणाकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष, इच्छाशक्तीचा अभाव आदींमुळे शहर पूर्वी आणि आताही जैसे-थे स्थितीत दिसते. यात पार्किंग, वाहतुकीची कोंडी, वाढत्या अतिक्रमणांसह रोज नवीन समस्यांची भर पडत असते.

महाजन, गडकरींचे विधान

भाजपचे दिग्गज नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच दौऱ्यावेळी यंत्रणेला सक्त सूचना देताना अवैध व्यवसाय, दादागिरी, गुंडगिरीला चाप लावा, कायदा- सुव्यवस्थेला प्राधान्य द्या, विकास कामांत चिरीमिरी, भ्रष्टाचार, निष्कृष्ट दर्जा खपवून घेणार नाही, अशी परखड भूमिका मांडली. त्यांच्या या विधानावरून धुळे काय आहे किंवा धुळ्यात काय चालते याविषयी अन्य कुठल्या पुराव्याची गरज पडू नये.

तत्पूर्वी, मोदी सरकारमधील अभ्यासू केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दौऱ्यावेळी धुळ्यात चांगले काम करण्यासाठी कुठला ठेकेदार आला की तो दिवाळखोरीत निघतो, असे हसून सांगत गंभीर विधान केले होते. मंत्री महाजन व मंत्री गडकरी केवळ भाजपचेच मंत्री नाहीत, तर ते संपूर्ण जनतेचे प्रतिनिधित्व करतात, तसेच न्यायहक्कासाठी बांधिल राहतात. त्यानुसार त्यांचे विधान सर्वपक्षीय मंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. या विधानांचे स्मरण सतत ठेवले गेले तर बराच बदल घडू शकेल, असा विश्‍वास ठेवायला काय हरकत आहे?

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in