
नाशिक : शिवसेनेचे (Shivsena) १३ माजी नगरसेवक शिंदे गटात(Eknath Shinde) सहभागी झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी शिवसेना भवनमध्ये (Uddhav Thackrey) पत्रकार परिषद घेऊन प्रवेशकर्त्यांची दलाल व गद्दार अशी संभावना केली. आगामी निवडणुकांमध्ये (NMC) त्यांना भुईसपाट करण्याचा दावा त्यांनी केला. या प्रवेशामागे अर्थकारण आहे हे लपुन राहिलेले नाही. (All ex corporators will be defeat by nashik people)
शिवसेना भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, शिवसेनेचे माजी गटनेते विलास शिंदे, राहुल दराडे, देवानंद बिरारी, भागवत आरोटे आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी बोलताना करंजकर म्हणाले, शिंदे गटात गेले ते दलाल आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली गेले, त्या अजय बोरस्ते यांना बारा वर्षात शिवसेनेने महत्त्वाची पदे दिली. स्थायी समितीचे सदस्यत्व दिले. विधानसभेची उमेदवारी, विरोधी पक्षनेते पद, महानगरप्रमुख पद अशी महत्त्वाची पदे दिली. यानंतरही संजय राऊत यांच्याबद्दल तोंडातील येईल ते बरळणे बोरस्ते यांना शोभत नाही.
त्यांची प्रतिक्रिया घृणास्पद व लाजिरवाणी आहे. शिवसेनेत अकरा नगरसेवक घेण्याचा दावा केला जात असला तरी यातील आठ ते नऊ नगरसेवक हे अन्य पक्षातून शिवसेनेत आलेले आहे. दोन ते तीन माजी नगरसेवक हे कट्टर म्हणता येईल. शिवसेनेत कट्टर कार्यकर्त्यांची कमी नाही, पक्षासाठी झटणारे आहे. ज्यांनी आतापर्यंत पक्ष सोडला त्यांचे काय हाल झाले ते सर्वजण पाहत आहेत. त्याचप्रमाणे आताही अशा दलालांना भुईसपाट करू, जिद्दीने कामाला त्यांची जागा दाखवू.
खासदार राऊत यांच्याबरोबर ज्यांनी जेवण केले. त्यातील काही खालेल्या भाकरीला जागले नाही. शिवसेना सोडून त्यांनी स्वतःचा विश्वासघात केला आहे. ज्यांनी पक्ष सोडला त्यातील एकही निवडून येणार नाही. काही लोक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा असल्या तरी अशा लोकांना रोखण्यासाठी जबाबदारी निश्चित करणार असल्याचा दावा त्यांनी केला.
प्रवेशामागे अर्थकारण
अर्थकारणाचा अंदाज सांगता येणार नाही, मात्र प्रवेशामागे अर्थकारण नक्की आहे. अर्थकारणाशिवाय कोणी पक्ष सोडणार नाही, असा दावा करंजकर यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.