दादा भुसे यांना राजन विचारे शिवसेनेत येण्याचे निमंत्रण देतील का?

दादा भुसे सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत, मात्र त्यांनी सविस्तर भूमिका मांडलेली नाही.
Rajan Vichare News, Dada Bhuse News, Nashik News, Nashik News
Rajan Vichare News, Dada Bhuse News, Nashik News, Nashik NewsSarkarnama

नाशिक : सोयरीक आणि विचार यांना राजकारणात खुप महत्त्व असते. माजी कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि ठाण्याचे शिवसेना (Shivsena) खासदार राजन विचारे (Rajan Vichare) हे व्याही आहेत. कालच खासदार विचारे यांनी शिवसेनेसोबत राहण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर श्री. भुसे सोयऱ्याचे अनुकरण करून शिवसेनेत परतणार का? की विचारे त्यांना `मातोश्री`वर नेणार याची कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. (Dada Bhuse is with Eknath Shinde, will he join shivsena again)

Rajan Vichare News, Dada Bhuse News, Nashik News, Nashik News
काँग्रेसमधील दुफळी थांबविण्यासाठी बाळासाहेब थोरात शोधणार उपाय : तांबेंकडून चाचपणी सुरू

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला साथ दिली. यामध्ये आधी शिवसेनेच्या सर्व घडामोडींत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले दादा भुसे शेवटच्या क्षणी शिंदे गात सामील झाले होते. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी देखील खंत व्यक्त केली होती.(Nashik Latest Marathi News)

Rajan Vichare News, Dada Bhuse News, Nashik News, Nashik News
दीपक केसरकरांनी तर बाॅंबच टाकला : भाजप-शिवसेना युती एका फोनसाठी थांबलीय....

मतदारसंघात परतल्यावर श्री. भुसे यांनी मोजक्या कार्यकर्त्यांची एका मंगल कार्यालयात बंद दाराआड बैठक घेऊन आपली भूमिका मांडली. मात्र मोजके बोलून लवकरच याबाबत सविस्तर बोलणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यामुळे श्री. भुसे आपली सविस्तर भूमिका केव्हा मांडणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

या पार्श्वभूमीवर गुरूपोर्णीमेला भुसे यांचे व्याही खासदार राजन विचारे यांनी एकाच वेळी आनंद दिघे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपण सदैव शिवसेनेच्या पाठीशीच राहणार असल्याचे सांगत भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे विचारे यांचे व्याही असलेले दादा भुसे त्यांचा मार्ग अनुसरणार का, व्याही राजन विचारे त्यांना मातोश्रीवर नेणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. (Shivsena latest Marathi news)

विचारे, भुसे यांच्यातील साम्य

खासदार राजन विचारे आणि आमदार दादा भुसे हे व्याही आहेत. याबरोबरच ते दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मित्र देखील आहेत. शिंदेशी मैत्री हा त्यांच्यातील समान धागा आहे. खासदार विचारे यांनी मैत्री आणि शिवसेनेशी निष्ठा दोन्ही जपल्या आहेत. दाद भुसे असे काही करतील का?. सध्या ते एकनाथ शिंदे गटासोबत ठामपणे उभे आहेत.

गुरूपोर्णीमेला काय घडले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील तब्बल ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर काही खासदार देखील त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. शिवाय ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, नाशिक, मुंबईमधील नगरसेवकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र या सगळ्यात एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे मात्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी विचारे यांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केली. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक जण आपल्या गुरुंची भेट घेवून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. गुरुपौर्णिमा निमित्त दरवर्षीप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विचारे यांनी ठाकरे यांना आमच्या सारख्या शिवसैनिकांची साथ कायम आपल्या सोबत असल्याची ग्वाही दिली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in