दादा भुसे, सुहास कांदेंना नवे सरकार मंत्रीपद देणार का?

राज्य मंत्रीमंडळात नाशिकच्या दादा भुसे, सुहास कांदे यांची मंत्रीपदाची अशा पूर्ण होईल का?
Suhas Kande, Dada Bhuse
Suhas Kande, Dada BhuseSarkarnama

नाशिक : राज्यातील ठाकरे सरकार (Mahavikas Aghadi) कोसळल्यानंतर नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे स्पष्ट आहे. यामध्ये दादा भुसे (Dada Bhuse) आणि सुहास कांदे (Suhas Kande) मंत्री होतील का? याची उत्सुकता आहे. (Whether Suhas kand & Dada Bhuse will get minstry in new Government)

Suhas Kande, Dada Bhuse
नव्या सरकारमध्ये असणार खानदेशचे ५ मंत्री

शिवसेनेत उभी फूट पडल्याने त्याचा परिणाम आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पालिकांच्या निवडणुकांवरदेखील होणार आहे. तत्पूर्वी, शिवसेनेच्या बंडखोर गटामधील कोणत्या नेत्यांना मंत्रिपदे मिळतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता तब्बल सहा आमदार शिंदे गटासोबत सामील झालेले आहेत.

Suhas Kande, Dada Bhuse
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा; अडीच वर्षांनंतर 'मविआ' सरकार पायउतार

मंत्रिपदासाठीची रस्सीखेच पुढच्या काळात पाहायला मिळेल. बंडखोरांसह भाजपमधील काही आमदारांचीही वर्णी मंत्रिपदासाठी लागेल, हे निश्चित आहे. नाशिकच्या वाट्याला दोन, तर खानदेशच्या खात्यात तब्बल पाच मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे.

मालेगाव बाह्यचे शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि महाविकास आघाडी सरकारमधील कृषिमंत्री दादा भुसे कॅबिनेट दर्जाचे मंत्री नव्या सरकारमध्येही असतील. दादा भुसे सुरवातीपासून एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात, तर नांदगाव-मनमाड मतदारसंघाचे शिवसेना बंडखोर आमदार सुहास कांदे राज्यमंत्री बनण्याची दाट शक्यता आहे.

सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्याविरुद्ध दंड थोपटल्यानंतर ते राज्यभर चर्चेत आले होते. त्यामुळे शिवसेना बंडखोरांपैकी या दोघांची वर्णी मंत्रिमंडळात लागणे जवळपास निश्चित मानले जात आहे. ज्या वेगवान घडामोडी राजकीय पटलावर होत आहेत, त्याहून वेगवान घडामोडी आता पुढच्या काही दिवसांमध्ये भाजपच्या अंतर्गत आणि त्यांना साथ देणाऱ्या आमदारांच्या गटात पाहायला मिळणार आहेत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com