`राष्ट्रवादी`ची मागणी कृषीमंत्री दादा भुसे मान्य करतील का?

दीपिका चव्हाण यांनी `पोकरा` योजना बागलाणला लागू करण्याची मागणी केली.
`राष्ट्रवादी`ची मागणी कृषीमंत्री दादा भुसे मान्य करतील का?
Deepika Chavan & Dada BhuseSarkarnama

सटाणा : नाशिक (Nashik) जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय शेती (Agreeculture) असल्याने जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेत बागलाण तालुक्याचा समावेश करून लाखो शेतकऱ्‍यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी राज्य महिला आयोगाच्या सदस्या व बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण (Deepika Chavan) यांनी कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Deepika Chavan & Dada Bhuse
भाजपची आयुक्तांवर आगपाखड, `प्रशासन टाईमपास करीत भाजपची बदनामी करते`

निवेदनात म्हटले आहे, की शेती क्षेत्रात बागलाण तालुक्यासह नाशिक जिल्हा जागतिक स्तरावर अग्रेसर आहे. जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आणि इतर सर्व संकटांवर मात करीत मोठ्या कष्टाने पिकांचे उत्पादन घेत असतो. मात्र, ऐन हंगामात येणारा अवकाळी पाऊस, गारपीट अशा विविध नैसर्गिक संकटांसह शेतमालाला उत्पादना इतकाही बाजारभाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतीक्षेत्र आणि शेतकरी उद्‌ध्वस्त होत आहे. शेतकऱ्‍यांना सक्षम करण्यासाठी राज्य शासनामार्फत जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविली जात असून, या योजनेंतर्गत प्रतिकूल हवामान बदलांशी सुसंगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती किफायतशीर करण्यासाठी वैयक्तिक शेतकरी व शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सशक्तीकरण करणे आदी लाभाच्या बाबींचा समावेश आहे.

Deepika Chavan & Dada Bhuse
राष्ट्रवादीकडून भाजपला “एक नवाब, सौ जबाब”

मालेगाव तालुक्यातील १४७ गावांचा या योजनेत नुकताच समावेश करण्यात आला असला तरी नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये ही योजना राबविणे अत्यंत गरजेचे आहे. नाशिक जिल्हा हवामान बदलास अतिसंवेदनशील जिल्हा असून, दरवर्षी नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान होत असते. या नुकसानीमुळे हतबल झालेल्या अनेक शेतकऱ्‍यांनी दुर्दैवाने आत्महत्याही केल्या आहेत. अशा परिस्थितीत शेती क्षेत्राला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे.

‘पोकरा’ योजनेत समाविष्ट कामे

या योजनेत ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्रे, पीक संरक्षक उपकरणे, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान उपकरणे, पेरणी यंत्र, कांदा चाळ, संरक्षक शेती (पॉलिहाऊस, पॉलीटनेल, शेडनेट) फळबाग लागवड, बांबू लागवड, नवीन विहीर, ठिबक व तुषार सिंचन, वैयक्तिक व सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, पाणीउपसा साधने (पंपसंच, पाईप), बंदिस्त शेळीपालन, परसबागेतील कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडूळ व सेंद्रिय खतनिर्मिती, वृक्ष लागवड, भूजल पुनर्भरण, मृद व जलसंधारण या कामांचा समावेश आहे.

‘पोकरा’ योजनेत अनेक कामांचा समावेश असल्यामुळे बागलाण तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्‍यांना वरदानच ठरणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेत संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा समावेश करावा.

- दीपिका चव्हाण, माजी आमदार, बागलाण

----------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in