शिवसेनेतील संकटावर कृषिमंत्री दादा भुसेंची मात्रा उपयोगी पडेल?

दादा भुसे यांचे एकनाथ शिंदे यांच्याशी घनिष्ठ संबंध उपयोगाला येण्याची आशा
शिवसेनेतील संकटावर कृषिमंत्री दादा भुसेंची मात्रा उपयोगी पडेल?
Dada Bhuse, Shivsena leaderSarkarnama

मालेगाव : कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. ते सतत संपर्कात असतात. श्री. शिंदे यांनी नगरविकास विभागाकडून नुकतेच मालेगावसाठी शंभर कोटींचा निधी देखील दिला. त्यामुळे श्री. भुसे या संबंधांचा उपयोग शिवसेनेतील (Shivsena) संकट निवाळण्यासाठी करतील का? याची सध्या चर्चा आहे. (Dada Bhuse can play a major roll in present political situation)

Dada Bhuse, Shivsena leader
शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री पदी का पाहवत नाही?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे काय निर्णय घेणार, याविषयी मतदारसंघासह जिल्ह्यात उत्सुकता आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेच्या मुशीत वाढलेल्या श्री. भुसे यांचे श्री. शिंदे यांच्याशी मैत्रिपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. यातच ठाणे येथील खासदार राजन विचारे हे भुसे यांचे व्याही झाल्यानंतर या मैत्रीला चारचाँद लागले. त्या पार्श्वभूमीवर पक्षनिष्ठा की मित्रप्रेम, हा निर्णय घेणे म्हणजे श्री. भुसे यांच्यासमोर मोठे धर्मसंकट आहे.

Dada Bhuse, Shivsena leader
अखेर कन्फर्म झालं...एकनाथ शिंदेंसोबत ३७ आमदार, ठाकरे सरकार पडणार?

श्री. शिंदे यांच्या बंडाचे वृत्त आज सकाळी प्रसारमाध्यमात झळकल्यानंतर शहरातही जोरदार चर्चा सुरू झाली. इलेक्ट्रॉनिक मीडियाने नेहमीप्रमाणे शहनिशा न करता श्री. भुसे ‘नॉट रिचेबल’ या आशयाचे वृत्त दाखविण्यास सुरवात केली. सकाळी श्री. भुसे आपल्या शासकीय निवासस्थानी होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीसही ते उपस्थित होते. याच दरम्यान श्री. भुसे, माजी मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना श्री. शिंदे यांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. या संदर्भात ‘सकाळ’ने भुसे यांच्याशी संपर्क केला असता, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. प्रस्ताव घेऊन जाण्याएवढा मोठा नेता नाही. तूर्त याप्रश्‍नी प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही, असे सांगितले.

शहर व तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्येही चलबिचल होती. दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे दुसरे आमदार सुहास कांदे यांचेही मातोश्री, उद्धव ठाकरे, त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर व पक्षाचे नेते संजय राऊत यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. तूर्त श्री. कांदेही ‘नॉट रिचेबल’ असून, शिंदे यांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे. यामुळे मालेगाव व नांदगाव विधानसभा मतदारसंघाकडे अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत श्री. भुसे यांच्यासाठी शहरात तीन वेळा भेटी दिल्या. दोनदा विविध विकासकामांसाठी, तर एकवेळा श्री. भुसे यांचे पुत्र युवासेनेचे संघटक आविष्कार यांच्या विवाह सोहळ्यासाठी त्यांनी येथे हजेरी लावली. गेल्या महिन्यातच शिंदे यांच्या पुढाकारातून शहरातील विविध रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागातर्फे श्री. भुसे यांनी मिळवून आणला. श्री. शिंदे, खासदार विचारे यांचे अतिशय सलोख्याचे व घरोब्याचे संबंध आहेत.

ठाणे जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यात दोघांचा सिंहाचा वाटा आहे. श्री. शिंदे हे मित्र म्हणून श्री. भुसे यांना जवळचे आहेत. दुसरीकडे पक्ष नेतृत्वाने अतिशय अटीतटीच्या वेळेत कृषिमंत्रीपदाची जबाबदारी सोपवून भुसे यांच्यावर विश्‍वास दाखविला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवानेते आदित्य ठाकरे यांच्याशीही भुसे यांची जवळीक आहे. भुसे यांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराला आदित्य ठाकरे मालेगाव दौऱ्यावर आले होते. युवानेते आदित्य यांच्याशी आविष्कार भुसे यांचे संबंधही सर्वश्रृत आहेत. ही परिस्थिती पाहता श्री. भुसे यांना ‘इकडे आड, तिकडे विहीर’, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या धर्मसंकटावर ते कशा पद्धतीने मात करणार, याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in