Dhule News: मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस उद्या रावल यांना मंत्रीपदाचा शब्द देतील का?

उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमास नेत्यांची उपस्थिती.
Eknath Shinde, Devendra Fadanvis
Eknath Shinde, Devendra FadanvisSarkarnama

धुळे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, (Chandrakant Patil) केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे शनिवारी दोंडाईचा दौऱ्यावर असतील. उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरी सत्कार, शेतकरी मेळावा यासह विविध कार्यक्रमास मंत्रिगण उपस्थित राहणार आहेत. (CM & Dy CM will attend the Programme arrenged by Jaykumar Rawal)

Eknath Shinde, Devendra Fadanvis
Nashik News: मतांचा विक्रम करणाऱ्या अमृता पवारांना यंदा संधी हुकली!

यानिमित्ताने भाजपचे माजी मंत्री जयकुमार रावल यांनी मंत्रीपदासाठी फिल्डींग लावली आहे. ती यशस्वी होईल का? देवेंद्र फडणवीस या दौऱ्यात त्यांना शब्द देणार का? याची त्यांच्या समर्थकांना उत्सुकता आहे.

Eknath Shinde, Devendra Fadanvis
Shivsena; शिवसेनेचा नाशिक महापालिकेसाठी ‘हंड्रेड प्लस’चा नारा!

स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याने कृषी महाविद्यालयाच्या इमारतीसह बहुउद्देशीय संकुलाचे लोकार्पण, दादासाहेब रावल उद्योग समूहाला ५० वर्ष पूर्ण झाल्याने त्या ठिकाणी नवीन ग्लुकोज (फॉर्मासिटीकल) प्रकल्पाच्या इमारतीचे उद्‌घाटन यासह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमरावती आणि भोगावती नदीच्या संगमावर ७५ फुटी ध्वजस्तंभाचे उद्‌घाटन, शिंदखेडा तालुक्यातील शेतकयांसाठी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या संकल्पनेने निर्माण होणा-या सहकारमहर्षी दादासाहेब रावल सहकारी सूतगिरणीचे ई- भूमीपूजन आदी कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होईल.

खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हीना गावित, आमदार गिरीश महाजन, आमदार गुलाबराव पाटील, आमदार दादा भुसे, आमदार जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, आमदार राजेश पाडवी, आमदार विजयकुमार गावित, आमदार मंजुळा गावित, दोंडाईचाच्या माजी नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल, भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष कुसुम निकम, पंचायत समितीच्या सभापती अनिता पवार, उपसभापती राजेश‍ पाटील आदी उपस्थित असतील.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in