भाजपचा आजचा मोर्चा प्रचारला साजेशा होणार की?...

नाशिक शहर भाजपतर्फे राज्य सरकारविरोधात आज नाशिक शहरात निघणार मोर्चा.
Girish Palve, BJP
Girish Palve, BJPSarkarnama

नाशिक : भाजपचे सातपूर विभागाचे अध्यक्ष व अत्यंत कार्यक्षम कार्यकर्ते अमोल इघे यांचा कामगार संघटनेच्या वादातून खुन झाला होता. हा प्रश्न भाजपने अतिशय आक्रमकपणे मांडला. यातील संशयीताला अटक झाली मात्र तो श्री. इघे यांचा पूर्वाश्रमीचा सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. या प्रश्नावर मोर्चा काढण्याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे केली होती. या पार्श्वभूमीवर शहरात आज भाजपतर्फे मोर्चा काढण्यात येत आहे. त्यामुळे त्याला राजकीय शक्तीप्रदर्शनाच्या दृष्टीने पोहिले जाते आहे.

Girish Palve, BJP
अन्य राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुका, मग महाराष्ट्राशीच दुजाभाव का?

आजच्या मोर्चाकडे विविध अंगानी पाहिले जाते आहे. विशेषतः महापालिका निवडणूक येऊ घातली आहे. त्याच बरोबर शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या संघटन व जनमाणसावरील प्रभाव यादृष्टीने सातत्याने पक्षातील काही पदाधिकारी पडद्यामागे प्रश्न उपस्थित करीत असतात. त्यादृष्टीने शहराध्यक्ष पालवे यांच्या दृष्टीने या मोर्चाकडे पाहिले जाते. त्याची सोशल मिडीयासह विविध स्तरावर मोठी जाहिरात केली गेली आहे. त्यामुळे हा मोर्चा कसा होतो याची उत्सुकता आहे.

Girish Palve, BJP
आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच झेंडा फडकवणार!

ओबीसी आरक्षण, शहरातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, तसेच अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी दिली.

सकाळी दहा वाजता बी. डी. भालेकर येथून मोर्चा निघेल. सरचिटणीस आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार, अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्यासह महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, माजी आमदार बाळासाहेब सानप सर्व नगरसेवक सहभागी होतील. शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळल्याने नागरिक हैराण आहेत. विविध समस्यांमुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. मंत्र्यांना लोकांच्या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण बारगळले. यामुळे याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला जाणार आहे. भालेकर मैदाने, मेनरोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघेल.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com