
नाशिक : गेले काही दिवस कांदा, (Onion) द्राक्ष (Grapes) तसेच विविध शेतमालाचे दर घसरत आहेत. त्यामुळे शेतकरी (Farmers) हवालदील झाले आहेत. यासंदर्भात नाशिकसह (Nashik) राज्यात आंदोलन झाले. त्यामुळे भाजपच्या (BJP) लोकप्रतिनिधींचीही झोप उडाली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्या आमदारांचे तरी ऐकणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. (Onion, Grapes & Other agriculture product prices fall down)
नाशिकला कांदा आणि द्राक्ष ही दोन्ही प्रमुख पिके आहेत. त्यांचे दर कोसळले. त्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या धोरणावर टिका होत आहे. शेतकऱ्यांनी काल जिल्ह्यात आंदोलोन केले. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे लोकप्रतिनिधी अस्वस्थ झाले आहेत.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल किमान पाचशे रुपये विशेष अर्थसहाय्य अनुदान द्यावे अशी मागणी चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यापुर्वी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नाफेडमार्फत कांदा खरेदी करावी यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी निवेदन दिले होते. त्यामुळे आता सरकार आपल्या आमदार, खासदारांचे तरी ऐकेल की त्याकडे दुर्लक्ष करणार असा प्रश्न विचारला जात आहे.
जिल्ह्यात शेतकरी प्रामुख्याने कांदा उत्पादक आहे. सध्यस्थितीत कांद्याचे बाजारभाव ५०० ते ७०० रुपये प्रती क्विंटल आहे. भरघोस उत्पादन, वाढलेली साठवण क्षमता, काही परदेशी बाजार पेठांमध्ये बिघडलेली आर्थिक स्थिती, रशिया- युक्रेन युद्ध अशी कारणे प्रामुख्याने जबाबदार आहेत. केंद्र व राज्य सरकार नेहमीच कांदा उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्यासाठी निर्यात धोरण, नाफेड कांदा खरेदी व इतर मार्ग अवलंबत असते. पण तरी सध्यस्थिती मध्ये बाजारपेठेत कांदाभाव अत्यंत कमी आहे.
कमी बाजारभावामुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला असून त्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. अशा स्थिती मध्ये शेतकऱ्यांना ५०० रुपये प्रती क्विंटल आर्थिक मदत देवून दिलासा द्यावा. तसेच केंद्र सरकार कडून अजून उपाययोजना करून कांदा बाजारभाव वाढीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार डॉ.आहेर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.