NMC Election: प्रभागरचना बदलल्याने भाजप शिवसेनेला शह देणार?

महापालिका प्रभागरचना बदलताच प्रस्थापितांनी यू- टर्न घेत वाद टाळण्यावर भर दिला.
Sudhakar Badgujar, Shivsena
Sudhakar Badgujar, ShivsenaSarkarnama

नाशिक : राज्यातील (Maharashtra) सत्तांतरानंतर महापालिकेची (NMC) जुनी प्रभागरचना जैसे थे ठेवत भाजपने (BJP) चार सदस्यांचा प्रभाग केला. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. हा निर्णय शिवसेनेच्या (Shivsena) जुन्या रचनेमुळे पथ्यावर पडणार आहे. मात्र यानिमित्ताने भाजपकडून सेनेला शह देण्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्यात ते यशस्वी होतील का, याची चर्चा आहे. (Newly form Government cancle the ward structure on Municiple corporation)

Sudhakar Badgujar, Shivsena
Shivsena: एक गुलाबराव गेला, पण माझ्याकडे गुलाबाची बाग आहे!

त्रिसदस्यीय प्रभागरचना रद्द करून पुन्हा नव्याने चार सदस्यांच्या प्रभागांची घोषणा करण्यात आल्याने यापूर्वी बिघडलेली राजकीय गणिते नव्याने जुळण्यास प्रस्थापितांकडून सुरवात झाली आहे. मागील वादविवाद, पक्षांतर यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर तडजोड आता अपरिहार्य ठरणार आहे.

Sudhakar Badgujar, Shivsena
Dhule news: आमदार फारूक शाह यांनी बंद पथदिव्यांचे लोकार्पण केले

आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयारी करताना मागील पाच वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. पक्षावर नाराज होऊन अनेकांनी पक्षांतर केले, तर चार सदस्यांच्या प्रभागात एकमेकांची भांडणे झाली. त्यामुळे स्व:पक्षातच नाराजीची मोठी लाट निर्माण झाली. अनेकांवर मतदार नाराज झाले, तर काहींनी सुरक्षित प्रभाग तयार केले व शोधलेही. नवीन प्रभाग रचनेनुसार तयारी झाल्यानंतर जुन्या म्हणजे २०१७ च्या प्रमाणे निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आता नव्या राजकीय गणिताची मांडणी सुरू झाली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र

२०१७ च्या निवडणुकीत प्रभात १२ मध्ये काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले होते. नवीन प्रभाग रचनेत प्रभाग १६ व १७ मध्ये विभाजन झाल्याने काँग्रेस अडचणीत होती. आता जुन्या प्रभागानुसार पुन्हा काँग्रेसला आशा निर्माण झाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील व समीर कांबळे यांचा पॅनल भाजपला भिडेल. अशीच परिस्थिती जुन्या प्रभाग १४ संदर्भात राहील.

यांच्यासाठी फायदेशीर घोषणा

मनसेचे सलीम शेख व योगेश शेवरे, शिवसेनेचे संतोष गायकवाड, विशाल संगमनेर, प्रशांत दिवे, भाजपचे राकेश दोंदे, भगवान दोंदे, कमलेश बोडके, सतीश सोनवणे, काँग्रेसचे राहुल दिवे यांच्यातील काही जणांचे प्रभाग आरक्षणामुळे, तर काही जणांचे प्रभाग रचनेमुळे पत्ते कट होण्याच्या मार्गावर होते. शासन निर्णयामुळे मात्र आता तेदेखील सुरक्षित झाले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com