भिशीच्या पैशांसाठी तीने केला नवऱ्याचा खून!

सिन्नर येथे पत्नीला भिशीसाठी पैसे न दिल्याने पतीचा गळा दाबून खून केला.
Vanita Gaikar
Vanita GaikarSarkarnama

सिन्नर : राग आल्यावर व्यक्ती कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. असाच प्रकार मुसळगाव (सिन्नर) (Sinner) येथे घडला. भिशीचा हप्ता भरण्यासाठी पतीने (Husband) पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने पत्नीने फेटयाने गळा आवळून पतीची हत्या केली. ही घटना चर्चेचा विषय असून पोलिसांनी (Police) पत्नीला अटक केली आहे. (Wife murdered husband for rufuse to give money)

Vanita Gaikar
आमदार राहुल ढिकले तुम्हीच बाळासाहेब सानप यांच्याकडून काही तरी शिका!

मुसळगाव येथील महिलेने पतीचा फेटाच्या साह्याने गळा आवळून खून केला, मात्र ती आत्महत्या केल्याचा बनाव करून पोलिसांत तक्रार केली. पोलिसांना संशयास्पद वाटल्याने पोलिसी खाक्या दाखवताच पत्नीने खून केल्याची कबुली दिली, त्यात तिला अटक करण्यात आली आहे.

Vanita Gaikar
खासदार सुभाष भामरे पर्यावरणप्रेमींना साद घालणार!

सीताराम लक्ष्मण गायकर (४२, मु. आहुर्ली, पो. सांजेगाव, ता. इगतपुरी, ह मु. मुसळगाव हायस्कूल) असे हत्या झालेल्या पतीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती सीताराम गायकर यांनी पत्नी वनिता गायकर हिच्याकडे भिशीचे पैसे भरण्याकरता सहा हजार रुपये मागितले होते. या कारणावरून त्यांच्यात वाद होऊन संशयित वनिता गायकर हिने घरात असलेल्या फेट्याच्या दोरीच्या साहाय्याने पतीचा गळा आवळून जिवे ठार मारले.

त्यानंतर तिने पोलिस ठाण्यात येऊन पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचून खोटी माहिती दिली. यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली होती. एमआयडीसी पोलिसांना वनिताच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कसून चौकशी केल्यानंतर पत्नी वनिताने आपणच सीतारामचा खून करुन त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याची कबुली पोलिसांना दिली.

पोलिसांनी वनितावर हत्येचा गुन्हा नोंदवून तिला अटक करत कोर्टात रवाना केले. पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर. के. त्रिभुवन, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गोरक्षनाथ बलक तपास करत आहेत

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com