विधवा प्रथा हद्दपार करण्यासाठी बागलाणमधून ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा

राज्य महिला आयोगाच्या सदस्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांचे ग्रामपंचायतींना आवाहन
विधवा प्रथा हद्दपार करण्यासाठी बागलाणमधून ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा
Deepika ChavanSarkarnama

सटाणा : विधवापण (Widowhood) कोणाच्याच नशिबी नको, अशीच प्रत्येक स्त्रीची (Womens) भावना असते. मात्र, विधवापण आले की स्त्रीला अधिक यातना होतात. यासंदर्भात बागलाण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हेरवाडचा आदर्श (Example) घेत या प्रथांना गावातून हद्दपार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या सदस्या आणि माजी आमदार दीपिका चव्हाण (Deepika Chavan) यांनी केले. (Grampanchata shall take initiative to abrogate Widowhood)

Deepika Chavan
`राष्ट्रवादी`चे नेते यतींद्र यतीन पगार यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

श्रीमती चव्हाण म्हणाल्या, भारत देश विज्ञानवादी व प्रगतिशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढली जाणे, काही ठिकाणी हे साहित्य पतीच्या अग्नीत टाकणे यासारख्या प्रथांचे पालन केले जाते. विधवा महिलांच्या पुनर्विवाह, आरोग्य, आर्थिक, मुलांचे शिक्षण, अलीकडे कोरोनामुळे झालेल्या विधवा महिला यांचा प्रश्न दुर्लक्षित राहिला आहे.

Deepika Chavan
आघाडी सरकारने शिकवणी लावावी, पाहिजे तर कॉपी करावी!

त्या म्हणाल्या, मरेपर्यंत तिला सर्व प्रकारच्या कार्यक्रमात सहभागीही होता येत नाही. या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर, सरपंच सुरगोंडा पाटील आणि त्यांच्या ग्रामसभेने घेतला आहे. विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने उचलेले पाऊल हे खरोखर कौतुकास्पद आहे.

महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी विधवांसंदर्भातील अमानुष प्रथांविरोधात बदल घडविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तरीही विधवांचा मानसिक छळ होईल, अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला जोडलेल्या अनेक कुप्रथा अजूनही जिवंत आहेत. ‘पांढऱ्या कपाळा’ची म्हणून तिला दूषणे दिली जातात. हळदीकुंकू यासारख्या समारंभापासून सर्व प्रकारच्या धार्मिक विधींपासून तिला दूर ठेवले जाते. जिवंतपणी मरण अनुभवण्याचा प्रकार तिला मिळतो. नेहमीच उपेक्षित राहणाऱ्या या विधवांना सन्मान देण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा घेतलेला निर्णय उपयुक्त ठरणार आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. विधवा प्रथांचे पालन होत असल्याने प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या मानवी, संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते. त्यामुळे भविष्यात स्त्रियांच्या अधिकाराचे हनन होऊ नये, यासाठी बागलाण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा, या निर्णयाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन आपल्या गावातील विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे, यासाठी गावात विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घ्यावा.

- दीपिका चव्हाण, माजी आमदार, बागलाण

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in