शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री पदी का पाहवत नाही?

जयंत दिंडे यांनी शिवसेनेने सामान्यांना खरावर बसवले याचा विसर का पडतो, असा प्रश्न केला.
शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री पदी का पाहवत नाही?
Shivsena Leader Jayant DindeSarkarnama

नाशिक: मुख्यमंत्री (CM) स्वतःकडे नगरविकासमंत्रीपद ठेवायचे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांनी तसे केले नाही. असे असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakrey) यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांना पाच वर्षे मुख्यमंत्री पदी का पाहवत नाही? असा सामान्य कार्यकर्त्यांना भेडसावणारा प्रश्‍न आहे, असे शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते जयंत दिंडे यांनी सांगितले. (Why leaders disgust to see Shivsena suprimo`s Son as CM)

Shivsena Leader Jayant Dinde
अखेर कन्फर्म झालं...एकनाथ शिंदेंसोबत ३७ आमदार, ठाकरे सरकार पडणार?

नाशिकमध्ये शिवसेना कार्यालयाबाहेर काल कार्यकर्ते, नेत्यांची गर्दी झाली होती. विविध पदाधिकाऱ्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत असहमती दर्शवली. यातून आमदार काहीही म्हणत असले तरीही कार्यकर्ता पक्षाबरोबरच असल्याचे दिसून आले.

Shivsena Leader Jayant Dinde
सुहास कांदे म्हणतात, आता मी कुठे जातोय, हे माहीत नाही!

ते म्हणाले, खरे म्हणजे, विस्थापितांना शिवसेनेत राजकारणात प्रस्थापित केल्याचे हजारो उदाहरणे आहेत. शिवसेना ही नाहीरे वर्गातील समाज, प्रस्थापितांनी कायम सत्तेपासून लांब ठेवलेल्यांना जवळ घेणारा व प्रतिष्ठा देणारा पक्ष आहे. ज्यांनी कोणी वेगळी भूमिका घेतली, त्यांनी थोडे मनात डोकावून पाहिले पाहिजे. आपण कोण होतो आणि शिवसेनेमुळे कुठे पोहोचलो. त्यामुळे खऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांना सध्याची घटना अतिशय वेदनादायी आहे.

श्री. दिंडे यांनी शिवसेनेवर असे आघात अनेकदा झाले आहेत. ते पचवुनच आम्ही वाटचाल केली आहे. आज देखील शिवसेना या संकटातून निश्चित बाहेर पडेल. जे लोक राज्यातील सरकार पडावे यासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत, समाज एक दिवस त्यांना अशा वाईट गोष्टींबद्दल निश्चित जाब विचारील. उत्तर देखील देईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या संकटातून देखील तावून सुलाखून बाहेर पडेल. कारण सर्वसामान्य शिवसैनिक पक्षाबरोबरच आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in