संजय राऊत मीडियाच्या भोंग्यातून बांग का देता?

मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टिका केली.
Nitin Sardesai
Nitin SardesaiSarkarnama

औरंगाबाद : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) रोज सकाळी उठून मीडियाच्या (Media) भोंग्यातून बांग देत असतात. महागाईवर बोला असा प्रश्न करीत असतात. अहो आम्ही हिंदूत्वावर (Hindutva) बोलणारच. महागाईवर बोलायला तुमचे बावीस खासदार दिल्लीत (Delhi) काय करतात? असा प्रश्न मनसे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी केला.

Nitin Sardesai
नाशिकमध्ये गद्दारांमुळे मनसेची सत्ता गेली!

औरंगाबाद शहरात राज ठाकरे यांची आज सभा झाली. राज ठाकरे यांच्या भाषणापूर्वी ते बोलत होते. ते म्हणाले, आजच्या सभेने सगळ्यांच्याच काळजात धडकी भरली आहे. त्यामुळे काय वाट्टेल ते विरोधक बोलत सुटले आहेत. ते म्हणतात, पैशाने गर्दी आणली आहे. यातील एक तरी माणुस पैशाने आणलेला आहे काय?. ते म्हणतात, औरंगाबादला फक्त शिवसेनेच्या सभेलाच गर्दी होते. अहो आमच्या या सभेकडे सबंध देशाचे लक्ष लागले आहे. देशभरात ज्याची चर्चा आहे तो नेता म्हणजे फक्त राज ठाकरे हेच आहेत.

Nitin Sardesai
बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसैनिक नव्हता, मी उपस्थित होतो: फडणवीस

श्री. सरदेसाई म्हणाले, शिवसेना नेते म्हणतात, औरंगाबाद हा केवळ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मला त्यांना सांगायचे आहे की, हा तुमहा गड होता. आता तो राहिलेला नाही. अन्यथा एमआयएमचा एक खासदार आणि बावीस नगरसेवक निवडून आलेच नसते. या सभेला झालेली गर्दी मतांमध्ये परावर्तीत होणरा नाही हे आमच्या विरोधकांचे मत आम्ही खोटे ठरवू. येथे आलेला यापुढे प्रत्येक निवडणुकीत फक्त आणि फक्त मनसेलाच मतदान करणार आहे. तुमचे मात्र काही खरे नाही, कारण आमदार आत्ताच ढुशा देत आहेत. कदाचीत लवकरच तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल.

नितीन सरदेसाई यांनी खासदार संजय राऊत यांना चांगलेच टोमणे मारले. ते म्हणाले, मनसे हा भाजपचा भोंगा आहे, अशी टिका ते करतात. आम्हाला तसे करायची गरजच नाही. मात्र तुम्ही कोणाचे भोंगे आहात. तुम्ही शिवसेनेत राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे भोंगे झालेला आहेत. हे इतक्या सफाईदारपणे भूमिका बदलतात की, त्यावर पीएच. डी. करता येईल. यांच्या भूमिका एव्हढ्या वेळा बदलल्यात की त्यावरून हा माणुस लवकरच शिवसेना संपवेल. ते राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्याचे काम बेमालुमपणे करीत आहेत.

सरदेसाई म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका आम्ही पुढे नेत आहोत, अशी टिका होते. मात्र आम्हीच ती भूमिका पुढे नेऊ शकतो. शिवसेनेने आपली भूमिका केव्हाच बदलली आहे. आमच्या रक्तात हिंदूत्व आहेत. यांचा रक्तगट मात्र कधी भगव्याचा हिरवा झाला हे देखील त्यांना समजलेले नाही. मात्र महाराष्ट्र आणि देशाचा रक्तगट भगवाच आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com