अंबानींच्या घराखाली गाडी का ठेवली?, हे अजून तरी कळलं का?

राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केली खंत
Raj Thakre

Raj Thakre

Sarkarnama

नाशिक : अंबानींच्या घराखाली गाडी का ठेवली, अजून तरी कळलं का? गाडी ठेवणाऱ्याचा हेतू कळला नाही, मात्र गृहमंत्री अनिल देशमुख आत आहेत. देशात आर्यन आणि सुशांतवर चर्चेत वेळ वाया घातला जातोय, अशी खंत मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thakre) यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, सामान्य मतदार पाच वर्षे विविध प्रश्‍नांना तोंड देतात. पण, निवडणुकीत मात्र भलत्याच मुद्द्यावर चर्चा भरकटविल्या जातात. विशेष म्हणजे मतदारही त्याला बळी पडतात, ही खरी खंत आहे.

<div class="paragraphs"><p>Raj Thakre</p></div>
भाजप आमदार सावकारे म्हणतात, `मुझे पहचानो, मै हू डॉन...!`

नाशिक दौऱ्यावर असलेले श्री. ठाकरे यांनी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले, की अचानक ओबीसी आरक्षणाचा विषय कसा आला, जितक सोपं वाटत तितकं सोपं नाहीये हे. कोण कोर्टात गेलं? का गेलं? हे समजून घ्यायला हवं. जातीपातीतून बाहेर येत नाही तोपर्यंत हे असंच सुरू राहणार. राज्यातील मुख्य प्रश्‍नांवरून लोकांचे लक्ष विचलित करून काहींना हा महाराष्ट्र मुद्दामच जातीपातीत ठेवायचा आहे. त्यातच काहींचे हित आहे, पण हे मतदारांच्या लक्षात येत नाही. ही मूळ अडचण आहे.

<div class="paragraphs"><p>Raj Thakre</p></div>
`एसटी`चे व्यावस्थापन खाजगी तज्ञांच्या हातात देणे आवश्यक!

कोरोनासंदर्भात सरकार काय नियम करते हे प्रशासकीय यंत्रणेलाच कळत नाही. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचे नियम पाहायला मिळतात. कोरोना काळात ठराविक मंडळींना सूट मिळत असल्याने त्यातून अनेकांमध्ये अस्वस्थता आहे. सिनेमागृहात एसी नको; पण रेस्टॉरंटमध्ये चालतो, हे कसले नियम? नियमांबाबत सरकारमधील लोकांनाच समजत नाही. आचारसंहिता काळात कॅमेरा कुठे घेऊन जायचा, याचे भान यांना नाही. बाथरूमपर्यंत कॅमेरा घेऊन फिरायचे. जे नियम सरकारच्या लोकांनाच माहीत नाही ते सामान्य लोकांना काय समजणार? गाइडलाइन व्यवस्थित असायला पाहिजे.

स्‍ट्रॅटेजी कुणी जाहीर करतं का?

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मनसे-भाजप युतीविषयी ते म्हणाले, की प्रसारमाध्यमेच युतीच्या चर्चा घडवून आणतात, पण तुमचा सोर्स समजत नाही. अशा युतीच्या चर्चा सुरू असतील; पण त्या मलाच माहीत नाही. निवडणुकांची तयारी, दौऱ्याविषयी पत्रकार परिषदा घेऊन राजकीय पक्ष स्ट्रॅटेजी सांगत असतो का, असा प्रश्‍न करीत त्यांनी, मनसेने केलेले नाशिकमधील काम नाशिककरांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com