Chhagan Bhujbal; भीमाशंकरच का तुळजापूरही देऊन टाका!

मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले तेव्हा भीमाशंकरची देण्याची बोलणी करून आले होते की काय?
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : (Nashik) आसामच्या (Assam) मुख्यमंत्र्यांनी ज्योर्तिलींग भीमाशंकर (BhimaShankar) धर्मस्थळावर दावा सांगितला आहे. त्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी खिल्ली उडवली. हे चाळीस लोक (Eknath Shinde) गुवाहाटीला गेले तेव्हा ही बोलणी करून आले होते की काय?. देऊन टाका भीमाशंकरच काय तुळजापुरही (Tuljapur) देऊन टाका, असा उपरोधीक टोला त्यांनी लगावला. (Whether CM was in Gowhati hade he negotiate on Our Holy places)

Chhagan Bhujbal
Nashik News; शिवसेना सुपरस्टार सुधाकर बडगुजर यांनी सलमान खानलाही मागे टाकले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या क्षमता वाखानन्याजोगी आहे. त्यामुळेच ते मंत्रीमंडळ विस्तार करत नसावे, असा टोला लगावला.

Chhagan Bhujbal
Dada Bhuse News; शिवजयंती सजावटीवरून दादा भुसे आणि अद्वय हिरे वाद पेटला

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी भिमाशंकर ज्योर्तिलींग आमचेच खरे असा दावा केला होता. त्याबाबत श्री. भुजबळ यांनी त्यांचा खरपुस समाचार घेतला. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टिका केली.

ते म्हणाले, त्यांना काय हवे ते द्या, नाही तरी उद्योग नेतच आहेत. आता आमची धार्मिकस्थळेही घेऊन जा. भिमाशंकर घेऊन जा. तुळजापुर घेऊन जा, श्रीसप्तश्रृंगी निवासीनी घेऊन जा. हे लोक काहीही मागत सुटलेत. आपले चाळीस लोक त्यांच्याकडे गुवाहाटीला गेले होते. तेव्हा ते काही सांगून आले की काय? हे कळत नाही. तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला हे सर्व देऊन टाकू. काहीही मागणी करतात, काहीही बोलतात. काय चालले आहे हे कळतच नाही.

ते पुढे म्हणाले, मला असे वाटते की, सामान्य नागरिकांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत. त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे चालले असावे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कांदा प्रश्न आहे. अडाणीचा प्रश्न आहे. या सगळ्यांपासून सामान्यांचे लक्ष हटविण्यासाठी हे काम सुरु असावे. त्यासाठी हे नवीन नवीन फंडे निर्माण केले जातात. त्यावर चर्चा घडवली जाते.

शेकडो वर्षांपासून, हजारो वर्षांपासून भिमाशंकर आहे. त्यात काही मतमतांतर नाही. मग प्रश्न येतो कुठे. मी स्वतः लहानपणापासून जातो आहे. पवार साहेब गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात विविध स्थळांचे उल्लेख आहेत. मग मधेच हे लोक काही तरी काढतात. त्याचे वाईट वाटते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com