महाराष्ट्राबाबत एव्हढा दुजाभाव का केला जातोय

"राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा" या दोन दिवसीय कार्यकर्ता शिबीरात छगन भुजबळ यांनी भाजपवर कठोर टिका केली.
Chhagan Bhubal
Chhagan BhubalSarkarnama

शिर्डी : जी.एस.टी (GST) संदर्भात महाराष्ट्राचा (Maharashtra) वाटा २३ हजार कोटी आणि गुजरात (Gujrat) फक्त ९ हजार कोटी आहे. तरीही महाराष्ट्राच्या बाबतीत एव्हढा दुजाभाव का (Why Maharashtra hurted) केला जातो, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राला कमजोर (Trying to weak maharashtra) करण्याचे हे प्रयत्न आहेत मात्र महाराष्ट्र कमजोर होणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला. (Chhagan Bhujbal raisedvariousquestions On BJP politics and inferior treatment to Maharashtra)

Chhagan Bhubal
मुख्यमंत्र्यांनी बैठक रद्द केल्याने शिंदे गटाचे कार्यकर्ते सतर्क!

"राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा" हे दोन दिवसीय कार्यकर्ता शिबीर शिर्डी येथे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

एसटीचे विलनीकरणाचे काय झाले?

ते म्हणाले, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून आमच्यावर टीका केली गेली. महाविकास आघाडी सरकार असताना विलनीकरणाची मागणी केली गेली, आंदोलन केले गेले, एव्हढच नाही तर पवार साहेबांच्या घरावर हल्ला झाला. आता त्या मागणीचे झाले काय ? आता का एसटीचे विलनीकरण केले जात नाही...? असा सवाल उपस्थित करत केवळ पवार साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी यावेळी सांगितले.

Chhagan Bhubal
शिवसेना अभेद्य राहिल्याने नाशिकमध्ये शिंदे गट अस्वस्थ?

राज्यात धार्मिक द्वेषाचे राजकारण

फुले, शाहु, आंबेडकरांच्या राज्यात धार्मिक द्वेषाचे राजकारण काही मंडळी करु पाहत आहेत. पण ते विसरतात की धर्मांध सत्तेच्या विरोधात उभे राहण्याची ताकद फुले - शाहु - आंबेडकरच आम्हाला देतात. धर्मांध पक्षाशी लढा हा विकासाच्या मुद्दावरुनच करावा लागेल. आपण विकासाचे राजकारण करतो पण देशात सध्या काय चालु आहे याचा विचार करत आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने आपल्याला तयार रहावं लागणार आहे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

आत्ताच दिवाळी पार पडली मात्र कितीतरी लोकांच्या घरात खायला अन्न देखील नव्हते. शेतकऱ्यांवर पावसामुळे मोठे संकट ओढावले मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची मदत हे सरकार देत नाही. महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आ वासून उभे असतांना नोटेवर कोणाचा फोटो याचीच चर्चा जास्त असल्याची टीका त्यांनी केली.

किमती २०० टक्क्यांनी वाढल्या

श्री भुजबळ म्हणाले की, देशात वाढती महागाई, बेरोजगारी, गॅसचे दर, पेट्रोलचे दर, अर्थव्यवस्थेची लागलेली वाट, कोळसा संकट, वाढते खाद्यतेल दर या सगळ्या वरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी जाणुन बुजुन तुमच्या समोर वेगळे मुद्दे आणले जात आहे. जेंव्हा केंद्रात आघाडी सरकार होते तेंव्हा महगाईचा दर हा ४.७ % टक्के होता. आज हा दर १४.५५ % टक्के एव्हढा वाढलाय की तुमच्या घरात तुम्हाला रोज लागणाऱ्या सगळ्या वस्तुंच्या किमती ह्या २०० ते ३०० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

वर्षानुवर्षे केस बंद होत नाही

ते म्हणाले की, सत्य परिस्थीतीवर बोलले तर भाजपाच्या यंत्रणा कामाला लागतात आणि मग घरी केंद्र सरकारच्या यंत्रणा येऊन पोहचतात. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अडचणीत आलेल्या कार्यकर्त्याच्या मागे पक्ष कायम ठामपणे उभा राहतो. ईडीने कारवाई केल्यानंतर जामिन लवकर मिळत नाही. मालमत्तेवरील जप्ती लवकर मुक्त होत नाही आणि वर्षानुवर्षे केस बंद होत नाही. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या कारवाया या फक्त भाजप सोडून इतर पक्षातील नेत्यांवरच होत आहेत. या केंद्रीय यंत्रणेमुळे अडचणीत असलेल्या कार्यकर्त्यांना पवार साहेब कधीही एकटे सोडत नाही, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या पाठीशी कायमच पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिलेला आहे आणि येथुन पुढे देखील राहील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com