निधी देऊनही महापौर गुलाबराव पाटलांची बदनामी का करतात?

भाजप-शिंदे गटाचा आरोप : शिंदे गटात येण्यासाठी धमकी दिल्याचा पुरावा द्या
Jayshree Mahajan & Gulabrao Patil
Jayshree Mahajan & Gulabrao PatilSarkarnama

जळगाव : जळगाव शहराच्या विकासासाठी गुलाबराव पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला. त्यातून महापौर, उपमहापौरांनी आपल्या प्रभागांत कामे करून घेतली. तरीही पालकमंत्र्यानी निधी दिला नसल्याचा आरोप करून महापौर जयश्री महाजन पालकमंत्र्यांची बदनामी करीत आहेत, असा आरोप भाजप- शिंदे गटातर्फे संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आला. (Eknath Shinde Group questions why Guardian ministers defamation)

Jayshree Mahajan & Gulabrao Patil
महिलांचा अनादर करणाऱ्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात ही पत्रकार परिषद झाला. शिवसेना शिंदे गटाचे महानगराध्यक्ष नीलेश पाटील, नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत, गजानन देशमुख, भाजपचे नगरसेवक राजेंद्र घुगे-पाटील, विशाल त्रिपाठी, जितेंद्र मराठे आदी उपस्थित होते.

Jayshree Mahajan & Gulabrao Patil
अब्दुल सत्तारांची अवस्था पाहून अन्य मंत्री धास्तावले?

नीलेश पाटील म्हणाले, की महापौर जयश्री महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप करीत आहेत. त्यांनी शहराच्या विकासासाठी निधी दिला नसल्याचे त्यांचा आरोप आहे. वास्तविक पालकमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात शहराच्या विकासासाठी निधी दिला आहे. त्याचा आम्ही पुरावाच दिला आहे. मात्र, प्रशासनाकडून निधीतून काम करून घेण्यास महापौर असमर्थ ठरल्या आहेत. केवळ पालकमंत्र्यांना बदनाम करण्यासाठीच त्या आरोप करीत आहेत. आपल्याला शिंदे गटात येण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप त्या करीत आहेत. त्यांचा आरोप निखालस खोटा असून, त्याबाबत त्यांनी पुरावा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

शिंदे गटाचे नवनाथ दारकुंडे व ॲड. दिलीप पोकळे म्हणाले, की महापालिकेत पालकमंत्र्यांनी निधी देऊनही तो खर्च करण्यात आलेला नाही. आम्ही महासभेत वारंवार प्रश्‍न उपस्थित केले. मात्र, महापौरांनी त्याचे उत्तरही दिलेले नाही. महामार्गावरील वीजखांबसाठी पावणे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. अद्यापही त्याचे काम झालेले नाही. केवळ महापौरामुळेच हा निधी रोखण्यात आला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपचे नगरसेवक राजेंद्र घुगे-पाटील यांनीही शिवसेनेच्या सत्ताकाळात शहरात कोणतीही कामे होत नसल्याचा आरोप केला. आमची महापालिकेत सत्ता असताना, आम्ही हुडको, जिल्हा बँकेचे कर्ज शासनाकडून माफ केले. विकासकामांसाठी निधीही उपलब्ध केला. मात्र, आताच्या सत्ताधाऱ्यांना उपलब्ध निधीतून कामही करता येत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in