Congress News: `फॉक्सकॉन`विषयी ९० टक्के चर्चा झाली होती!

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात प्रकल्प गुजरातला गेल्याने संतप्त झाले.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

मुंबई : फॉक्सकॉन (Foscon) प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्माण होणार होती. हा प्रकल्प राज्यात यावा याबाबत ९० टक्के चर्चा झाली होती. त्यानंतर एवढा मोठा प्रकल्प गुजरातला (Gujrat) गेला. तेव्हा मुख्यमंत्री (Eknath Shinde) काय करत होते?. त्यांनी याबाबत काय केले?. हे जनतेला समजलेच पाहिजे, असा प्रश्न काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे. (Congress leader Balasaheb Thorat aggressive on Fokscon project issue)

Balasaheb Thorat
Nashik News: सीईओ अकार्यक्षम...जि. प. प्रशासन भगवान भरोसे!

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) फॉक्सकॉन प्रकल्पावर (Fokscon) जवळपास ९० टक्के चर्चाही केली होती. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरातला गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे. राज्यातील सरकार काय करत होते? असा प्रश्न काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

Balasaheb Thorat
मुख्यमंत्री सभांत व्यस्त... राज्याचा 1. 54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातने पळवला

श्री. थोरात पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पसंदीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. महाविकास आघाडीच्या सरकारनेही अडीच वर्षांच्या काळात मोठी गुंतवणूक राज्यात आणली. त्यातून राज्यातील लाखो तरुणांच्या हाताला काम दिले. परंतु `मविआ`चे सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की, फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची कोणतीच माहिती राज्य सरकारला समजली नाही का? हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने काय प्रयत्न केले?

मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष व केंद्रातील भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत आले आहे. फडणवीस सरकार राज्यात असताना मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गुजरातला हलवण्यात आले. अनेक महत्वाचे प्रकल्प व कार्यालयेही गुजरातला हलवण्यात आली. बुलेट ट्रेनची गरज नसतानाही महाराष्ट्राच्या माथी हा प्रकल्प लादला गेला. आता पुन्हा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत याचे गांभीर्य या सरकारला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्कार सोहळे करण्यात व देवदर्शनात व्यस्त आहेत. त्यातून त्यांना राज्य कारभार करण्यास वेळ मिळत नसावा पण थोडे लक्ष राज्याच्या कामकाजात दिले असते तर एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला नसता. आता गुंतवणूकही गेली आणि लाखो रोजगारही गेले. हे का झाले याचा खुलासा महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे, असेही थोरात म्हणाले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in