Amrishbhai Patel : पगार घेता ना?, कशासाठी घेता?, कामे करा नाही तर घरी जा!

Why do you get paid, do the work or else go home-आमदार अमरिशभाई पटेल यांनी भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझ़डती घेतली
Amrishbhai Patel at land survey office
Amrishbhai Patel at land survey officeSarkarnama

Shirpur News : सातवा वेतन आयोग लागू झाला ना... चांगला पगार घेता ना... तो कशाबद्दल मिळतो... हे शिवसेना पदाधिकारी अथवा तपासणीसाठी आलेल्या चौकशी अधिकाऱ्यांने नव्हे तर चक्क भाजपचे आमदार अमरिशभाई पटेल यांचे शब्द आहेत. (BJP MLA Amrishbhai Patel took the government employees to task)

भूमिअभिलेख कार्यालयाच्या (Dhule) कामकाजाबाबत नागिरकांच्या मोठ्या प्रामणात तक्रारी असतात. त्याची दखल घेतली जात नाही. मात्र भाजपचे (BJP) आमदार अमरिशभाई पटेल (Amrishbhai Patel) यांनी मात्र त्याची दखल घेतली.

Amrishbhai Patel at land survey office
Dhule Congress: दुष्काळग्रस्तांसाठी काँग्रेसचा सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम!

या कर्माचा ऱ्यांना `लोकांची कामे करा नाही तर घरी जा...` असे खडे बोल माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांनी मंगळवारी येथील भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुनावले. संतप्त आमदार पटेल यांनी तासभर या विभागाची झाडाझडती घेतली. त्यांची ही स्टाईल पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.

भूमिअभिलेख विभागाच्या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी हजर नसतात. नागरिकांची अनेक महिने कामे प्रलंबित ठेवली जातात. कर्मचाऱ्यांकडून दुरुत्तरे मिळतात, अशा तक्रारी काही पदाधिकाऱ्यांनी आमदार पटेल यांच्याकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार पटेल यांनी भूमिअभिलेख कार्यालयात पोचले होते.

Amrishbhai Patel at land survey office
Nashik Politics : शरद पवारांच्या दौऱ्यात दिसला जि. प. इच्छुकांतील राजकीय गुंता!

यावेळी त्यांनी ताधिकारी प्रमोद भामरे यांनाही बोलावून घेतले. शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील उपस्थित होते.

कार्यालय बंद करायचे का?

भूमिअभिलेखचे उपअधीक्षक गोविंद भाबड यांना गैरहजेरीबाबत विचारणा केली. त्यांनी आपल्याकडे अतिरिक्त प्रभार असल्यामुळे आठवड्यातून दोनच दिवस शिरपूरला येत असल्याचे सांगितले. त्यावर तुमच्या कार्यालयाबाहेर हजर असलेले वार नमूद करून फलक लावावा, अशी सूचना आमदार पटेल यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in