Vinod Nikole news : आपल्या देशामध्ये भिकारी भिक का मागतो ?

सरकारने रोजगार, शिक्षण, रेशन, पाणी हे सामान्यांचे प्रश्न सोडविले असते तर चित्र बदलले असते.
Vinod Nikole
Vinod NikoleSarkarnama

Vinod Nikole news : राज्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाचे, सर्व नागरिकांचे अन्न, पाणी, रोजगाराचे प्रश्न सोडवले असते तर आपला समाज देखील उन्नत बनला असता. देशात मंदिरांपासून तर रेल्वेस्थानकापर्यंत भिकारी भीक मागताना दिसले नसते, असे प्रतिपादन आमदार विनोद निकोले यांनी केले. (Youth should enter politics with selflessness attitude)

तरुणांनी (Youth) निस्वार्थपणे राजकारणात यावे. तसे केले तरच त्यांना समाजाचे प्रश्न समजतील व सोडवता येतील, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) आमदार विनोद निकोले (Vinod Nikole) यांनी म्हटले आहे.

Vinod Nikole
Chhagan Bhujbal On Raj Thackeray : राज ठाकरे, फुले, शाहू, आंबेडकरांचे नांव का घेत नाही?

राजकारणात जे तरुण-तरुणी येण्याची इच्छा बाळगतात त्यांनी कोणत्या गोष्टीपासून लांब राहावं आणि मगच राजकारणात यावं याबाबत आमदार निकोले म्हणाले की, हे बघा आज आपण कोणत्याही शासकीय कार्यालयात गेलो तिथे आपल्या सर्वांचे महापुरुषांचे प्रतिमा लागलेले आहेत. ज्यांनी समाजासाठी काम केलं. निस्वार्थपणे काम करण्याची तयारी आहे का हे पाहिलं पाहिजे.

राजकारणात येणाऱ्या तरुणाने कोणताही स्वार्थ मनामध्ये ठेवता कामा नये. स्वार्थ घेऊन ते आले तर तो राजकारणामध्ये व्यक्तीगत यश प्राप्त करेल. परंतु, तो समाजासाठी काहीही करू शकणार नाही. देश हितासाठी ते काही करू शकणार नाहीत. आणि स्वार्थ सांगितला तर पैसे इतर गोष्टी येतात. यापासून तो नक्कीच लांब राहिला पाहिजे. तरच तो समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो.

Vinod Nikole
Eknath Shinde News: राजकीय भवितव्याबाबत शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ?

ते पुढे म्हणाले, ज्या विचारधारेवर मी काम करतो. त्या विचारधारेवर माझं असं मत आहे किंवा ती विचारधारा सांगते की, एखाद्या राज्याच्या म्हणा, गावाचं म्हणा, देशाचं म्हणा, जिल्ह्याचं म्हणा, एखाद्या राज्याचं सरकार किंवा देशाचं सरकार जेव्हा तुमच्या हातात असते किंवा तुम्ही सत्तेवर असता, जेव्हा सत्ता आपल्या हातामध्ये असते तेव्हा आपलं हे कर्तव्य असते की, देशातील प्रत्येक नागरिक आणि समाजातील एकदम शेवटच्या घटकाला सुखी जीवन कसं जगता येईल हे पाहणे असते.

आमदार निकोले म्हणाले, जो राजकारणात येईल त्याने किंवा सत्तेवर बसलेल्यांनी आपण प्रत्येकाचे मत हे घेतो ना, तर मग प्रत्येकाच्या बाबतीत तो विचार केला पाहिजे. माझ्या देशामध्ये भिकारी भिक मागतो याचा अभ्यास मला करावा लागेल. मंदिराच्या समोर पण आज भिकारी दिसतो, रेल्वे स्टेशनवर, बस स्थानकावर तुम्ही बघा सिग्नलवर भिकारी दिसतो भिक मागतो का?. त्याचा अभ्यास करावा लागेल, असे आमदार निकोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com