Winter Session News: अधिवेशन सोडून माणिकराव कोकाटे नाशिकला परतले, कारण...

राज्य विधीमंडळाचे नागपूरमध्ये (Nagpur) हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु आहे.
Manikrao Kakate
Manikrao Kakate

राज्य विधीमंडळाचे नागपूरमध्ये (Nagpur) हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु आहे. मात्र अधिवेशनात कोणाचा मृत्यू कसा झाला? महापुरुषांचे अपमान, राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप हेच विषय सुरु आहेत. मग राज्यातील इतर विषय संपलेत का? असा सवाल करत सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी नाशिक गाठले आहे.

कोरोना संसर्गामुळे दोन वर्षे (Corona) राज्यातील अधिवेशन झाले नाही. अशातच सहा महिन्यांपूर्वी राज्यात पुन्हा सत्तांतर झाले. कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे नागपूरला हिवाळी अधिवेशन भरले, पण अधिवेशनात विरोधी अपक्ष आणि सरकार यांच्यामध्ये कुरघोड्यांचेच राजकारण सुरु आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणापासून मंत्री, नेत्यांची प्रकरणे उकरून काढत त्यावरुन आरोप प्रत्यारोप केले जात आहे. पण राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतपिकांचे नुकसान, पीकविमा, रस्ते, पाणी या विषयांवर तर चर्चाच होत नसल्याचे दिसून येत आहे. या कारणानेच अधिवेशनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत कोकाटे नाशिकमध्ये परतले आहेत

Manikrao Kakate
PMPML कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज: सातव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

हिवाळी अधिवेशनासाठी आमदार कोकाटे गेल्या आठ दिवसांपासून नागपूरला गेले होते. पण सध्या अधिवेशनात शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, पीकविमा, वीजबिल, रस्ता, पाणी या आणि मतदारसंघातील विषयांवर चर्चाच होत नसल्याचे कोकाटे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तिथे थांबून उपयोग काय अशी उद्विग्न प्रतिक्रीयाही त्यांनी दिली आहे. आम्ही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तर कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षाची गळचेपी सुरु आहे. राज्यातील महत्त्वाच्या विषयांना बगल देण्यासाठी अधिवेशनात वेगळ्या विषयांवर चर्चा केली जात असल्याचा आरोपही कोकाटे यांनी केला आहे. त्यामुळेच अधिवेशनात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोप व कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याने सभागृहात थांबणे अवघड झाले, म्हणूनच आम्ही घरची वाट धरल्याचे कोकाटे यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in