Ahmednagar : कर्डीलेंच्या टोपीखाली काय-काय दडलंय; फडणवीस असं म्हणताच एकच हशा; नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis : कर्जत-जामखेड मतदारसंघात आज शेतकरी मेळावा पार पडला
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात आज (दि.11 मार्च) विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ''शिवाजी कर्डीले यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. कर्डीले साहेब हे चमत्कार घडवण्यासाठी फेमस आहेत. टोपीखाली काय-काय दडलंय'', असं म्हणताच व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांमध्ये एकच हशा झाला.

Devendra Fadnavis
Ahmednagar : काँग्रेसला मोठं खिंडार; 'या' बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 8 मार्चला झाली. यामध्ये महाविकास आघाडीचे बहुमत असतानाही भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची अध्यक्षपदी वर्णी लागली.

Devendra Fadnavis
Kirit Somaiya News: ते १९ बंगले कुठं गायब केले? रश्मी ठाकरेंचं नाव घेत सोमय्यांनी ठाकरेंना डिवचलं

त्यामुळे विखे पाटील आणि कर्डिले यांनी चमत्कार घडवत शेवटच्या क्षणी बाजी पलटवल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती.

याच पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना ''कर्डीले साहेब हे चमत्कार घडवण्यासाठी फेमस आहेत, त्यांच्या टोपीखाली काय-काय दडलंय'', अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यामुळे व्यासपीठावर एकच हशा झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com